घरनवी मुंबईMumbai News : नवी मुंबईचा शहर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी

Mumbai News : नवी मुंबईचा शहर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी

Subscribe

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 26(1) अन्वये 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विहित मुदतीमध्ये 16 हजार 194 सूचना व हरकती आल्या होत्या.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून जवळपास 33 वर्षांनंतर प्रथमच शहर विकास आराखडयाची शासनाकडे मंजूरीकरिता सादर करण्याची कार्यवाही पालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. या अहवालाला हिरवा कंदील कधी मिळते हे पहावे लागणार आहे. (Mumbai News Navi Mumbais city development plan before the government for final approval)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 26(1) अन्वये 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विहित मुदतीमध्ये 16 हजार 194 सूचना व हरकती आल्या होत्या. त्यावर शासनाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या नियोजन समितीकडून सुनावणी देखील झाली आहे. सुनावणीनंतर शहराचे विकास नियोजन करण्याच्या अनुषंगाने शहर विकासाचा अंतिम आराखडा 16 फेब्रुवारी 2024 रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

- Advertisement -

नियोजन समितीच्या अहवालावर नियोजन प्राधिकरण या नात्याने प्रशासक नार्वेकर यांनी आवश्यक त्या ठिकाणी प्रारूप विकास योजनेत बदल व फेरबदल करून सदरची प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 28(4) नुसार प्रसिद्ध करण्यास मंजूरी दिली आहे.

नियोजन समितीच्या शिफारशीनुसार प्राप्त झालेल्या निर्देशा प्रमाणे आरक्षित भुखंडांची सिडकोने निविदेव्दारे केलेले वितरण याबाबत शासनाने नवी मुंबई पालिकेस सिडकोच्या मालकीच्या भुखंडांवर विकास योजनेत आरक्षण न दर्शविणेबाबत सिडकोच्या विनंतीनुसार विकास योजनेत सिडकोने विक्री व वितरण केलेल्या भुखंडावर आरक्षण न प्रस्तावित करण्याबाबत विचार करण्याचे पालिकेल्या आदेश या बाबी विचारात घेऊन आवश्यक ते फेरबदल केले आहेत. तसेच फेरबदल दर्शविणारा नकाशा देखील प्रसिद्ध करण्यात आलेला असून, हा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ महापालिकेत उपलब्ध आहे. प्रारूप विकास योजनमेध्ये एकूण 625 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली होती. नियोजन समितीने सुचविलेले फेरबदलानुसार एकूण 537 आरक्षणे प्रस्तावित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : PM Modi : अयोध्या, काशीचा विकास बघितल्यामुळे राहुल गांधी नाराज – मोदी

गावातील क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन

प्रारूप विकास योजनेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खाजगी जमिनी या भागश: ऐरोली, भागश: दिघा, भागश: इलठण, भागश: बोरिवली व अडीवली, भूतवली या महसूली गावातील क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले नव्हते. फेरबदलानुसार शहरातील व क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : Politics : “तुतारी” फक्त स्टेजवर…; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा

विकासाला चालना मिळणार

विकास आराखड्यात सूक्ष्म नियोजन करून त्यामध्ये रस्त्याचे जाळे, सार्वजनिक सोयीसुविधाकरिता आवश्यक असलेले भुखंड आरक्षित करण्यात आले असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सदर क्षेत्रातील जमिन मालक हे या जमिनींच्या विकासापासून वंचित होते. अशा सर्व जमिन मालकांना विकास योजनेस मंजूरी मिळाल्यानंतर दिलासा मिळणार असून सदर क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -