Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई एकनाथ शिंदे नव्हे...डॉ. एकनाथ शिंदे! मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी बहाल

एकनाथ शिंदे नव्हे…डॉ. एकनाथ शिंदे! मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी बहाल

Subscribe

एकनाथ शिंदे यांची ओळख आता नुसतं एकनाथ शिंदे नाही तर डॉ. एकनाथ शिंदे म्हणण्यास सुरूवात करावी लागणार आहे.

CM Eknath Shinde Get Doctorate Degree : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची ओळख आता नुसतं एकनाथ शिंदे नाही तर डॉ. एकनाथ शिंदे म्हणण्यास सुरूवात करावी लागणार आहे.

नवी मुंबई इथल्या डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभ नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. सामाजिक, आरोग्य आणि आपत्कालीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

- Advertisement -

यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आभार व्यक्त करताना त्यांनी एक खोचक विधानही केलं. “मी डॉक्टर यापूर्वीच झालो आहे. अधून मधून छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो. नऊ महिन्यापूर्वी जे राज्यात मोठं ऑपरेशन केलं, त्यानंतर जे जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरले.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तसंच यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी यापुढे बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका देखील केलीय. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपल्याकडे संधी, पद आणि जबाबदारी असते तेव्हा आपण घरात बसायचं नसतं. रस्त्यावर उतरून सर्व सामान्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करायची असते. ही शिकवण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंनी मला दिली. म्हणून महापूर असो किंवा मग करोना काळ…प्रत्येक काळात आमची डॉक्टरांची टीम थेट केरळपर्यंत जाऊन काम करत होती. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला मंत्र आम्ही पाळतो.” तसंच आज मी मुख्यमंत्री झालो असलो तरी कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आताही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

सामाजिक क्षेत्रात खास करून कोरोना काळात रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, त्याना रेमडेसीवीर आणि इतर औषधे मिळावीत यासाठी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच लोकांमध्ये मिसळून त्यांनी अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि बेडस रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळ येथील महापूर असो, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य असो किंवा कोल्हापूर महाड येथे आलेल्या महापूरावेळी केलेले मदतकार्य असो आशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जात त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

“कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. कधी विचारही केला नव्हता की डी. लिटसारखी प्रसिद्ध पदवी मिळेल. पण ज्या विद्यापीठातून मुलगा डॉक्टर झाला त्याच विद्यापीठातून आपल्यालाही डी.लिट सारखी पदवी मिळते, ही अभिमानाची बाब आहे. विचार न करता बरंच काही मिळत गेलं. यासाठी मी या विद्यापीठाचा आभारी आहे. मला डी वाय पाटील विद्यापीठाकडून ही पदवी मिळाल्याचा आनंद आहे.”, असं देखील

- Advertisment -