घरनवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचे साखळी उपोषण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचे साखळी उपोषण

Subscribe

सिडको व्यवस्थापकीय संचालकांना मागण्यांचे निवेदन

नवी मुंबई/बेलापूर-: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पातील बाधित त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सिडको भवन समोर बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत. (Project affected at Navi Mumbai International Airport) सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आले आहे.

या निवेदनात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाधितांना मागील ४ ते ५ वर्षात न्याय देण्यात आलेला नाही. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, सिडकोने नाकारलेल्या बांधकामांना सरसकट पुर्ण पॅकेज लागू करावे, मच्छिमारांना २०१३ च्या कायद्या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, १८ वर्षावरील सर्व युवक युवतीनां रोजगार प्रशिक्षण द्यावे, प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन नोकरीत घ्यावे, चिंचपाडा, तळावपाली गावासाठी तिप्पट भुखंड व पुर्ण पॅकेज लागू करावे, ज्यांची घरे तोडली आहेत त्यांना वाढीव भत्ता व घर भाडे द्यावे आदी मागण्या मांडल्या आहे.

- Advertisement -

या संदर्भात सप्टेंबर २०२३ ला मुख्य दक्षता अधिकारी (सिडको) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली मात्र त्यात निर्णय झाला नसल्याने १५ जानेवारीला सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती अतिरिक्त भुमी व भूमापन अधिकार्‍यांनी मागण्यांसाठी सकारात्मक असून आपल्या मांगण्याचा अहवाल व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने अप्पर मुख्य सचिव (नगरविकास) यांच्या मंजुरी करीता वर्ग करतो आहोत, असे लिखित दिले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न सुटला नसल्याने बेमुदत साखळी उपोषण सुरु केल्याचे प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -