घरनवी मुंबईमालमत्ता कर बुडव्यांना जप्तीचा शॉक; पालिकेच्या कारवाईनंतर ४० लाखांचा कर जमा

मालमत्ता कर बुडव्यांना जप्तीचा शॉक; पालिकेच्या कारवाईनंतर ४० लाखांचा कर जमा

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा प्रभाग समिती क्षेत्रात मालमत्ता कर बुडणाऱ्या नागरिकांना महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. दिघा विभागात प्रथमच मालमत्ता कर वसुली मोहीम जोरदारपणे सुरू आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा प्रभाग समिती क्षेत्रात मालमत्ता कर बुडणाऱ्या नागरिकांना महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. दिघा विभागात प्रथमच मालमत्ता कर वसुली मोहीम जोरदारपणे सुरू आहे. दिघा विभागात मोठ्या सोसायट्या, इमारतींमधील रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिकेने वारंवार कळवूनही मालमत्ता कर भरलेला नाही. त्यानुसार मालमत्ता कर वसुलीवर भर देत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या जप्तीची निर्देशानुसार दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोहर गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी सुनिता गाडगे, कर निरीक्षक संजय गायकवाड, लिपिक संतोष म्हात्रे, लिपिक श्रीकांत कोळी, लिपिक धनराज पवार यांच्या पथकाने मालमत्ता कर वसुली आणि अभय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली होती.

मालमत्ता करातून नागरिकांना सोयीसुविधा पुरवल्या जातात. ही बाब लक्षात घेता पालिका क्षेत्रातील सर्वच करदात्यांनी वेळेवर कर भरावा. त्याचप्रमाणे ३१ मार्चपर्यंत सुरू असणाऱ्या अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. दिघा विभागात इमारती थकबाकीदार व्यावसायिक यांनी वेळेवर कर भरावा, अन्यथा महापालिकेकडून नोटिसी बजावलेल्यावर पर्यायी जप्तीची कारवाई करण्यात येईल.
– सुनिता गाडगे, वसुली अधिकारी, प्रभाग समिती, दिघा

- Advertisement -

महाराष्ट्र महापालिका अनुसूची ‘ड’ प्रकरण-८ कराधान नियम ४२ व ४३ अन्वये जप्तीची नोटीस थकीत मालमत्ताधारकांना यापूर्वी बजावण्यात आली. परंतु त्यानंतरही काही संबंधितांकडून थकीत मालमत्ता कर पालिकेकडे भरण्यात आला नाही. त्यानंतर महापालिकेने जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. तर सात दिवसात कर भरणा न केल्याने जप्तीची कारवाई सुरु केली. दिघा विभागातील थकबाकीदारांकडून आत्तापर्यंत ४० लाखांची मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे सोसायटी आणि व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ग्रीन वर्ल्ड सोसायटीकडे ५० लाख थकीत

प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या माऊंट मेरी बिल्डरच्या ग्रीन वर्ल्ड या इमारतीतील क्लब हाऊस आणि ३२ व्यवसायिकांनी ५० लाखांपर्यंतचा पालिकेच्या मालमत्ता कर थकला आहे. या ठिकाणी दिघा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केल्यानंतर १० लाखांचा भरणा बिल्डर करून करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम दिलेल्या मुदतीत न भरल्यास पुन्हा कारवाईचा इशारा पालिकेने नोटीसद्वारे दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

आमदारांना मुंबईत ३०० घरे देण्याच्या निर्णयाला पवारांचा विरोध, आव्हाड काय निर्णय घेणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -