घरनवी मुंबईशिवबंधन तोडून नगरसेविका सुरेखा नरबागे यांची 'घरवापसी'!

शिवबंधन तोडून नगरसेविका सुरेखा नरबागे यांची ‘घरवापसी’!

Subscribe

शिवसेनेत गेलेले आणखी नगरसेवक परतीच्या मार्गावर - गणेश नाईक

भाजपला सोडून शिवसेनेत गेलेल्या सीबीडी बेलापूर येथील नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी बुधवारी पुन्हा भाजपात घरवापसी केली. भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुरेखा नरबागे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अशोक नरबागे व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. नवी मुंबई मनपा क्षेत्रातील सीबीडी बेलापूर प्रभाग क्रमांक १०३ मधील नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे आमदार गणेश नाईकांसोबत भाजपात गेल्या होत्या. मात्र, कालांतराने सुरेखा नरबागे आणि अशोक नरबागे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महाविकास आघाडीचा मार्ग धरून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेत फारकाळ जमू न शकल्याने वेळीच स्वगृही परतण्याचा निर्णय सुरेखा नरबागे आणि अशोक नरबागे यांनी घेतला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते रवींद्र इथापे, जेष्ठ नगरसेवक डॉ जयाजी नाथ, जेष्ठ नगरसेवक अशोक गुरखे, भाजप नेते दशरथ भगत यांच्या उपस्थितीत सुरेखा नरबागे,अशोक नरबागे यांचा भाजप पक्षप्रवेश झाला. सीबीडी बेलापूर प्रभाग १०३ येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. तिथे सुरेखा नरबागे यांनी मागील पाच वर्षात अनेक विकास कामे केली आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश महाविकास आघाडीला फायद्याचा होता. मात्र, नरबागे यांची घुसमट झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून पुन्हा भाजपचे कमळ हाती घेतले.

- Advertisement -

नवी मुंबई मनपा निवडणुकीत सुरेखा अशोक नरबागे या भाजपच्या १०३ प्रभागातील उमेदवार असतील असे गणेश नाईक यांनी यावेळी जाहीर केले. दरम्यान, राष्ट्रवादी, शिवसेनेत गेलेले आणखी काही नगरसेवक पुन्हा भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -