घरनवी मुंबईनवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्ती मिळणार

नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्ती मिळणार

Subscribe

गोरगरीब घरातील शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव विकास झंजाड यांनी अखंडितपणे पाठपुरावा केला होता.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दोन वर्षापूर्वीची शिष्यवृत्ती मिळाल नाही. गोरगरीब घरातील शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव विकास झंजाड यांनी अखंडितपणे पाठपुरावा केला होता. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची ही कैफियत आणली होती. आयुक्त बांगर यांनी त्याची दखल घेत त्याच्या आठवडाभरात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती येणार असल्याचे स्पष्ट केले.

भाजप नेते आमदार गणेश नाईक आणि आयुक्त अभिजीत बांगर यांना भेटून दोन वर्षांपूर्वी रखडलेली शिष्यवृत्ती देण्याची मागणी लावून धरली होती. याविषयी अधिक माहिती देताना झंजाड यांनी सांगितले की, गरीब व गरजू विद्यार्थी तसेच पात्र लाभार्थ्यांना २०१९-२० ची शैक्षणिक शिष्यवृत्ती रखडली होती. तर २०२०-२१ च्या शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जाचे वाटप करून शिष्यवृत्ती देण्यात आली नव्हती. कोरोनाच्या कालावधीत घरी बसून साध्या अभ्यासाबरोबरच शिष्यवृत्तीचा अभ्यास पूर्ण केला होता. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवले होते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून शहराचे नाव उंचावले आहे. परतीचे महापालिकेने विशेषतः शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही. दोन वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळावी. यासाठी पालिका आयुक्त बांगर यांची भेट घेऊन लवकर देण्याबाबतची मागणी लावून धरली.

- Advertisement -

आयुक्त बांगर यांनी पात्र लाभार्थ्यांना २०१९-२० ची लवकरात लवकर शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याबरोबर २०२०-२१ च्या शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जाचे वाटप लवकरच करून तिही शैक्षणिक शिष्यवृत्ती लवकरच देण्यात येईल, असे आश्वासित केल्याचे झंजाड यांनी सांगितले.

हेही वाचा –

दिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -