नवी मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबईत बेकायदा बॅनर आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत आठही विभागात राबवण्यात येणार आहे. यामध्ये परवानगी न घेतलेले तसेच परवानगीची मुदत संपलेले बॅनर आणि होर्डिंग्ज हटवले जातील.
हेही वाचा –Crime : गॅस कटरने खिडकी कापली, बँकेत प्रवेश केला अन् चोरट्यांचा जवळपास 14 कोटींच्या सोन्यावर डल्ला
नवी मुंबईत विनापरवानगी बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यांच्यावर ९ ऑक्टोबर रोजीच्या जनहित याचिकेनुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करताना खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. शिवाय या माध्यमातून शहराचे विद्रूपीकरण करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा –Maharashtra Election 2024 : मतदारांनी फिरवली पाठ तरी मतदानात वाढ; मुंबईकरांनी केली निराशा
रहिवासी तक्रार करू शकतात
होर्डिंग्ज, बॅनर विषयक कुणीही सूचना किंवा तक्रार करू शकतात. त्यासाठी संबंधित विभाग कार्यालयात अथवा महापालिकेच्या वेबसाईटवरील ग्रिव्हीयेन्स रिड्रेसल पोर्टलवर अथवा My NMMC या नवी मुंबई महापालिकेच्या ऍपवर किंवा ८४२२९५५९१२ या व्हॉट्सऍप क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Edited by :Dnyaneshwar Jadhav