नवी मुंबई : थर्टीफर्स्ट निमित्ताने नवी मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ३५०० पोलीस अधिकार्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून कडक पहारा दिला होता. शहरात कुठेही अनुचित प्रकार न घडता यंदा थर्टीफर्स्ट अर्थात नवीन वर्षाचे स्वागत शांततेत करण्यात आले. पोलिसांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी परिमंडळ-१ व २ मध्ये कारवाई करत मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे २६६ तळीराम तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या २ हजार ३५५ जणांवर कारवाई केली आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण वर्ग मोठया संख्येने बाहेर पडला होता. शहरातील पामबीच मार्ग, मिनी सीशोर त्याचप्रमाणे सुशोभित करण्यात आलेल्या चौकात जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. शहरातील सर्वच हॉटेल, चायनिज कॉर्नर, आईस्क्रीम कॉर्नर, बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती.
हेही वाचा..New Year Celebration : थर्टी फर्स्टच्या दिवशी 17,800 जणांना वाहतूक पोलिसांचा दणका; नियम मोडल्याचा फटका
नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर जनजागृती करण्यात आली.त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त क्षेत्रात रिक्षा चालक-मालक व दुचाकी स्वार यांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांध्ये महिनाभर जनजागृती केली. नवीन वर्षाचे स्वागत करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याला पनवेल व नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलिसांच्या फौजफाटयामुळे शहरात कुठे ही अनुचित प्रकार घडलेला नाही.
हेही वाचा…Santosh Deshmukh Murder : हत्येच्या तपासासाठी एसआयटी; आयपीएस तेलींसह 10 जणांचा समावेश
शहरात नवी मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू केली होती. मध्ये राशन करून वाहन चालवणारे चालक, वाहन चालवणार्यांवर एक जानेवारी २०२५ रोजी पहाटेपर्यंत तपासणी राबवण्यात आले. यात केलेल्या कारवाईत २१६ तालुका तेच प्रमाणे विना हेल्मेट सीटबेल्ट न वापरता वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या २३५५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला रोषणाई नाही
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी करण्यात येणारी पालिका मुख्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळली नाही. तर पामबीच मार्गावर तरुणांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
(Edited by Dnyaneshwar Jadhav)