Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईAssembly Polls 2024 : पोलिसांचे नवी मुंबईकरांसाठी ‘माय व्होट वेब पेज’

Assembly Polls 2024 : पोलिसांचे नवी मुंबईकरांसाठी ‘माय व्होट वेब पेज’

Subscribe

मतदान केंद्र, वाहन पार्किंगची माहिती देखील मिळणार

नवी मुंबई : २० नोव्हेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी नवी मुंबई पोलिसांनी देखील विशेष प्रयत्न केले आहेत. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘माय व्होट वेब पेज’ तयार केले आहे. नागरिकांसाठी एका क्लिकवर अनोखी सुविधा सुरू केली आहे. त्या आधारे मतदारांना विविध माहिती उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा… Assembly Polls 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; पुढील 36 तास ‘अर्थ’पूर्ण घडामोडींचे
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण विधानसभा या मतदार संघांचा समावेश होते. या ठिकाणी पालिका, निवडणूक आयोगाने स्वीप अंतर्गत मोठया प्रमाणावर जनजागृती केली आहे. तर पोलिसांनी निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांसाठी ‘माय व्होट वेब पेज’वर कार्यान्वित केले आहे. या पेजला क्लिक केल्यास मोबाईल क्रमांक टाकून नोंद मतदारांची नोंद होईल, त्यानंतर मतदारांना यादी भाग क्रमांक, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदार यादीतील नावे पाहता येतील. क्य आर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार संघाची यादी समोर दिसेल त्यावर क्लिक करुन आपला मतदारसंघ शोधून येथील सद्यस्थिती, मतदान केंद्रावर असणारी गर्दी याची माहिती घर बसल्या मिळणार आहे.
हेही वाचा… Pratibha Pawar : “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं होतंय,” प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
मतदारांनी वेज पेजच्या माध्यमातून पार्किंग, मतदान केंद्र, आपले नाव याची माहिती जाणून घ्यावी, दिलेल्या वेळेत मतदानचा आपला हक्क बजावावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी मतदारांना केले आहे.
पार्किंगची माहिती, मोबाईल लॉकर
मतदान केंद्राच्या बाहेर वाहनपार्किंग करता येत नसल्याने अनेक जण वाहने दूर थांबवून मतदानासाठी येतात. मतदारांना ज्या मतदान केंद्रात मतदान करायचे आहे. त्या मतदान केंद्राच्या परिसरातील पार्किंगचे ठिकाण जीपीएसच्या माध्यमातून कळणार आहे. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल वापरास बंदी आहे. मात्र असे असतानाही अनेक जण मोबाईल सोबत आणतात. ही बाब लक्षात घेता मतदान केंद्रा बाहेर मोबाईल लॉकरची सुविधा पोलिसांकडून उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -