घरनवी मुंबईनवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या!

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या!

Subscribe

नामांतरासाठी कृती समिती पाठपुरावा करणार

नवी मुंबई-: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि.बा.पाटील नाव देण्याच्या प्रस्तावामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा व ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठकीत घेण्यात आला. (Navimumbai Airport D.p.patil name proposal)

दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची बैठक काल सोमवारी आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झाली. या बैठकीस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील तसेच संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, अतुल पाटील, विजय गायकर, विनोद म्हात्रे, रूपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजाराम पाटील, दीपक म्हात्रे, नंदराज मुंगाजी, दीपक पाटील, सूर्यकांत मढवी, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, अनिल कटेकर, दिलीप तांडेल, दीपक म्हात्रे, डी.बी.पाटील, कृष्णा भगत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील नाव देण्यास उशीर होत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. शासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचे ठरले.

  • ओबीसींतून आरक्षणाला विरोध
    राज्यात सुरु असलेल्या मराठा व ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर देखील चर्चा झाली. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण शासनाने ओबीसी कोट्यामधून त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात आगरी समाजात प्रबोधन करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बैठका घेण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -