नवी मुंबई-: मागील साडेबारा वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी आणि दृष्टिक्षेपास पडणार्या नवी मुंबई मेट्रोतून गारेगार प्रवास शुक्रवारी (ता.१७) नागरिकांनी अनुभवला. बेलापूर आणि पेंधर या दोन्ही रेल्वे स्थानकातून दुपारी तीन वाजता नवी मुंबईकरांच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोने धाव घेतली. बेलापूर येथे सहव्यवस्थापकीय संचालक, सिडकोचे कैलास शिंदे व राजेश पाटील, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर त्याच प्रमाणे सिडको आणि मेट्रो प्रकल्प कंपनीचे अधिकारी, नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोचा (Navimumbai Metro) शुभारंभ करण्यात आला.
नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न सुरु होते. मात्र गेल्या सहा महिन्यात उद्घाटनाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख न मिळाल्याने काल गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांचे हेच लक्षात घेता होणारी अडचण टाळण्यासाठी औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता नवी मुंबई मेट्रो सुरु करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार सिडको प्रशासनाने मेट्रोचा शुभारंभ केला.
- मागील अनेक वर्षांपासूने नवी मुंबईकरांचे स्वप्न पुर्ण झाले आहे याचा अधिक आनंद आहे. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत मेट्रो नवी मुंबईकरांसाठी धावणार आहे. सिडको प्रशासनाला केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच मेट्रोचा टप्पा पार केला आहे.त्याबद्ल सरकारचे सिडकोतर्फे आभार मानतो.
– कैलास शिंदे, सह व्यवस्थापकीय संचालक सिडको - आजचा क्षण हा सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. नवी मुंबई शहराच्या दृष्टीने मेट्रो सेवा म्हणजे मानाचा तुरा आहे. शहराच्या जडणघडणीत योगदाना देणार्या सिडकोने मेट्रो सुरु करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.