घरनवी मुंबईNavi Mumbai morbe dam : नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी 'उडाले'

Navi Mumbai morbe dam : नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी ‘उडाले’

Subscribe

या संदर्भात 'आपलं महानगर'ने नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी जलसाठ्याचा आढावा घेतला जात असून त्यानुसार नियोजन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्ञानेश्वर जाधव/ नवी मुंबई – वाढत्या उन्हाची मोठी झळ नवी मुंबईकरांना बसली आहे. नवी मुंबईकरांच्या जलसाठ्यात अवघ्या पाच दिवसांत मोठी घट झाली आहे. (८ एप्रिल) नवी मुंबई महापालिकेने जलसाठ्याची आकडेवारी घेतली तेव्हा १ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले. तर ३ एप्रिल रोजी घेतलेल्या आढाव्यात १० ऑगस्टपर्यंत एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याचे बाष्पीकरण याच वेगाने होत गेले तर नवी मुंबईकरांना मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते.

यंदा उन्हाच्या झळा जरा जास्तच सोसाव्या लागत असल्याने सकाळी साडेदहा-अकरानंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होते. दुपारी तर संचारबंदी लागल्यासारखी स्थिती असते. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. पाच दिवसांपूर्वी (३ एप्रिल) ४७.२० टक्के असणारा पाणीसाठा (८ एप्रिल) ४५.४१ टक्के इतका खाली आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा…Water supply : ठाणे ग्रामीण भागात पाण्याचा दुष्काळ; शहापूर, मुरबाडमध्ये 32 टँकरने पुरवठा

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नवी मुंबईत नोडनुसार आठवड्यातून एकदिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि शहरी भागातील मुंबई, ठाण्यात पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेकडे मालकीचे धरण आहे. तरीही संभाव्य जलसंकट पाहून गेल्या वर्षीही पाणीटंचाईचा निर्णय घेतला होता. आताही ज्या वेगाने पाणीसाठी कमी होत आहे, ते पाहता तसाच निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा…Water supply : ठाणे ग्रामीण भागात पाण्याचा दुष्काळ; शहापूर, मुरबाडमध्ये 32 टँकरने पुरवठा

  • महापालिकेने ३ एप्रिलला आढावा घेतला तेव्हा १२८ दिवस पुरेल एवढा म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी निश्चिंत होते. पण आजच्या आढाव्यात वेगळेच वास्तव समोर आले.
  • आता १ ऑगस्टपर्यंत म्हणजे ११६ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. म्हणजे अवघ्या पाच दिवसांत १२ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा कमी झाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याचे ज्या वेगाने बाष्पीभवन होत आहे, हे पाहून अधिकारी देखील चक्रावले आहेत.

        मोरबे धरण आढावा
धरणाची उंची – ८८ मीटर
धरणाची क्षमता – १९०.८९ एम.सी.एम.
सध्याचा पाणीसाठा – ४५.४१ टक्के
३ एप्रिलची स्थिती – १२८ दिवसांचा साठा
८ एप्रिलची स्थिती – ११६ दिवसांचा साठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -