घरनवी मुंबईराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत रक्तदान शिबिर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत रक्तदान शिबिर

Subscribe

मल्लिकार्जुन पुजारी यांचा पुढाकार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी १२ डिसेंबर रोजी नवी मुंबईत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, सनफ्लॉवर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक ३९, सेक्टर २०, कोपरखैरणे येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी रक्तदान शिबिराची सुरुवात होणार आहे. कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटल ब्लड बँक रक्त संकलनासाठी येणार आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन पुजारी यांनी दिली.

- Advertisement -

कोरोना काळात रक्ताची मोठी गरज भासत आहे. मात्र, रक्ताचा तुडवडा भासत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये काही दिवसच रक्त पुरवठा पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे युवकांनी आणि सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती मल्लिकार्जुन पुजारी यांनी दिली. नवी मुंबईकरांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक तथा राष्ट्रवादीचे नेते मल्लिकार्जुन पुजारी यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -