घरनवी मुंबईपनवेलसह नवी मुंबईत एनआयए आणि ईडीचे छापे

पनवेलसह नवी मुंबईत एनआयए आणि ईडीचे छापे

Subscribe

5 arrested

पीएफआयचे ५ जण ताब्यात
वार्ताहर ः पनवेल
एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) सह ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने शहरासह नवी मुंबईत संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेशी संबंधितांची धरपकड देशभर सुरू आहे. त्यात अतिरेक्यांचे ‘पनवेल कनेक्शन’ समोर आल्याने ही छापेमारी करण्यात आली. पनवेल शहरातून मुसक्या आवळण्यात आलेली व्यक्ती ही व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली असून, मनी लाँड्रिंगच्या संशयावरून या छापेमारीत ईडीनेही सहभाग घेतला. नवी मुंबईतील नेरुळ येथील पीएफआयच्या कार्यालयात गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धाडसत्र सुरू करण्यात आले. यात ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनांत नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली पीएफआयच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एनआयए आणि ईडीच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत देशभरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य राज्यांमध्ये १०६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिरेकी संघटना म्हणून ओळखल्या जाणार्‍या पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असले तरी नेरुळ सेक्टर २३ मधील दारावे गाव या गावठाण भागात त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी एनआयएने धाड टाकल्यानंतर तब्बल ७ तासांच्या तपासणीनंतर चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यातील एक व्यक्ती याच परिसरातील रहिवासी असल्याचेही बोलले जाते. अतिरेक्यांचे ‘पनवेल कनेक्शन’ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -