घरनवी मुंबईखुशखबर! दिघावासियांना मिळणार २४ तास पाणी

खुशखबर! दिघावासियांना मिळणार २४ तास पाणी

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेशीवर असणार्‍या दिघा प्रभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी कसरत आता दूर झाली असून २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेशीवर असणार्‍या दिघा प्रभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी कसरत आता दूर झाली असून २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहेत. दिघा विभागातील सहा प्रभागांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, याकरता भूमिगत पाण्याची टाकी बांधणे व घरोघरी पाईपलाईन टाकणे त्याचप्रमाणे मलनिस्सारण वाहिन्या, रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि विविध कामांचा शुभारंभ नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते त्याचप्रमाणे माजी नगरसेविका अ‍ॅड. अपर्णा गवते, माजी नगरसेविका दीपा राजेश गवते यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक १ ते ५ व ९ नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरता आणि विविध समस्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पालिकेच्या सभागृहात आवाज उठवण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नांने प्रभागांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या व पंपहाऊस बांधणी, दिघा विष्णुनगर रस्त्याचे आरसीसी बांधकाम करणे, गणपती पाडा, सावित्रीनगर, फुलेनगर, साठेनगर, विठ्ठलनगर, पंढरीनगर, बिंदू माधवनगर, गणेशनगर येथे अंतर्गत पदपथ व गटारे बांधणे, प्रभाग क्रमांक ९ संजय गांधी नगर आणि प्रभाग ४ दिघानाका येथे सुलभ शौचालय बांधणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शहराचे प्रवेश द्वार असणार्‍या दिघा परिसराची दिघा गांव म्हणून कायमस्वरूपी ओळख हवी. याकरता उभारण्यात आलेले मुख्य प्रवेशद्वार आणि मुंबई ठाण्याकडून आलेल्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी बांधण्यात आलेले शिल्प त्याचे उद्घाटन पालकमंत्री आणि खासदारांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी ज्येष्ठ नगरसेवक एम. के. मढवी, ज्येष्ठ समाजसेवक राजेश गवते, प्रभाग समितीचे माजी सदस्य दामोदर कोटीयन, सदस्य संतोष मुळे, सदस्य चंद्राम सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –

लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -