घरनवी मुंबईदेवदूत : लोकनेते रामशेठ ठाकूर!

देवदूत : लोकनेते रामशेठ ठाकूर!

Subscribe

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात…आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने ते देवदूताची भूमिका पार पाडत आहेत.

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात…आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने ते देवदूताची भूमिका पार पाडत आहेत.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा माणसावर अधिक विश्वास

एक गोष्ट खरी आहे की, हाडामासाच्या माणसावर, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांची अधिक श्रध्दा आहे. माणसाच्या अंगात असलेल्या सामर्थ्याचा, कर्तॄत्व शक्तीचा, चांगुलपणाचा प्रत्यय ते चांगले जाणतात. माणसाने ठरविले तर आकाशाला भिडणार मोठेपण त्याच्या अंगी येवू शकेल असा त्यांचा आत्मविश्वास आहे, फक्त माणसाच्या ठायी असायला हवा तो दॄढ निश्चय. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात कर्तॄत्व फुलविणारी माणसे भेटत गेली आणि त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांना चांगले विचार दिले, दिले म्हणण्यापेक्षा ते त्यांनी घेतले. या सर्व व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात आदरभाव आहे. आता पर्यंतच्या आयुष्यात त्यांना जो लौकिक मिळाला त्याच श्रेय दयायच असेल तर ते कुणा एका व्यक्तीला न देता परिस्थितीला दयावे लागेल, परिस्थितीनेच त्यांना घडविले. विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमुळे काही माणसे, काही व्यक्ती त्यांच्या सानिध्यात आल्या परिस्थिती शहाणं बनविते या वास्तव्याची जाण करून दिली. मार्गदर्शन केले, आयुष्य सदैव समॄध्द केले, अनुभवाची क्षितीजे विस्तॄत झाली म्हणूनच आयुष्यात जे काही चांगल घडलं त्याच श्रेय परिस्थितीला दिले पाहिजे. मातोश्री भागूबाई, पिताश्री चांगू ठाकूर व सासरे जनार्दन भगत साहेबांचे आशिर्वाद त्यांना लाभले, प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीशक्ती असते ती शक्ती त्यांच्या पत्नी शकुंतला यांनी दिली तर पुढील कार्याला साथ लाभली ती आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर या सुपुत्रांची. शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन ते नेहमी कार्यरत राहिले असून त्यांचा माणसांवर अधिक विश्वास आहे. माणूसकी व कर्तव्याची जाण ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या जवळ असलेली आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावण्याचे ठरविले आणि त्यांनी तसे केल आणि आताही करीत आहेत. गरीब गरजूंना मदत, सामाजिक, सांस्कॄतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांना भरघोस मदतीचा हात, रूग्ण, खेळाडू, शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी सहकार्य, आपत्ती, दुष्काळ, अनेक घटकांना मदत हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दानशुरपणा अजूनही सुरूच आहे आणि तो सार्थकी लागत आहे म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मनाला समाधान वाटत असून राजकीय व आर्थिक शक्ती लोक कल्याणासाठी सार्थकी लावणारे लोकनेते म्हणून ते सुपरिचित आहेत.
लोकनियुक्त प्रतिनिधी खासदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या या पदाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात केलेली दर्जेदार विकासकामे आजही लोकांच्या स्मरणात राहिली आहेत. खासदार म्हणून त्यांनी येथील समस्या, प्रश्न संसदेत मांडतानाच रायगडच्या विकासाचा आलेख उंचावला. त्यामुळे आजही गावांतील ज्येष्ठ नागरिकांकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांचा उल्लेख आवर्जून ऐकायला मिळतो. देशभरातील विद्यालये पनवेल, नवी मुंबईत शिरकाव करीत असताना येथील गोर गरीब विद्यार्थ्याला सर्वोत्कृष्ट शिक्षणाची दालने उभी करून दिली. आज ज्या संस्थेच्या माध्यमातून गेली २७ वर्षे शिक्षणाचे पवित्र काम केले जात आहे, त्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचे सर्व श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाचे आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना करून खऱ्या अर्थाने लाखो लोकांना वैद्यकीय, आथिर्क मदत, शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी आर्थिक मदत, जीवनावश्यक वस्तूचे वाटप, अशी विविध प्रकारची मदत देत आधार दिला आहे. या मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उलवा नोडमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापना केली. आणि ते एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी निःशुल्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची दारे खुली केली.
सांस्कृतिक ठेवा म्हणून आगरी कोळी आणि आता मल्हार महोत्सव नावाने सुपरिचित झालेल्या महोत्सवाने संपूर्ण रायगड, नवी मुंबईसह राज्यात वाहवा मिळवली. अत्यंत सुंदर नियोजन आयोजनामुळे या महोत्सवाची दरवर्षी उत्सुकता वाढत राहिली. त्याचबरोबर पनवेल मॅरेथॉन त्यानंतर खारघर नावाने सुरु झालेल्या या स्पर्धेच्या दर्जेदार आयोजनामुळे संपूर्ण परिसरात मॅरेथॉन व त्या अनुषंगाने व्यायामाचे महत्व वाढले. आणि पनवेल मध्ये सुरु झालेल्या या मॅरेथॉनने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा सुरु केली. गेली २० वर्षे हि परंपरा अखंडपणे सुरु असून राज्यातील सर्वात मोठी हि दिवाळी अंक स्पर्धा म्हणून सुप्रसिद्ध आहे.ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजकारणाबरोबर शिक्षणाची आवड आहे, त्याचप्रमाणे ते क्रीडा क्षेत्राचीही आवड ठेवतात. त्यामुळे देशातील कबड्डी पट्टूचा थरार रायगड, नवी मुंबईला अनुभवायला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन त्यांनी सातत्याने करत खेळ आणि पर्यायाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आले आहेत.
शिक्षण हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आत्मा त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांने उच्च शिक्षण घेतले पाहिजे हि त्यांची तळमळ असते. उच्च शैक्षणिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात येते. आज हि मदत घेऊन हजारो विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन कुणी पायलट तर कुणी इंजिनिअर, आर्किटेक्ट होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
रयत शिक्षण संस्था हि लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मातृसंस्था राहिली आहे. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असतानाही त्यांनी झुकते माप रयतला दिले. आज ते रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. पण ते स्वतःला रयत सेवक समजून काम करीत असतात. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांच्या उभारणीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. रायगड जिल्हयातील विद्यालयांसह महाराष्ट्रातील अनेक शाखांना नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी निस्वार्थीपणे केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचे ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ साताऱ्यात उभारले जात आहे. हा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचाच गौरव नाही तर पनवेल,उरण, रायगडचा सन्मान आहे.
स्थानिक, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच अग्रभागी राहून काम केले आहे. दिवंगत दि. बा. पाटील, थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या प्रेरणेने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच सर्व समाजासाठी काम केले. दिबांसाहेबांच्या लढ्यात त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे. दि. बा. पाटीलसाहेब प्रकल्पग्रस्तांचे दैवत आहेत त्यांनी प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी सर्वस्व अर्पण केले आणि त्याच भावनेतून आणि आदरातून लोकनेते रामशेठ ठाकूर काम करताना दिसतात. सध्या नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, हि ठाम भूमिका मांडत सातत्याने प्रयत्नशील राहून सर्वपक्षीय कृती समितीची चळवळ वृद्धिंगत केली आहे. काहीही होवो दिबासाहेबांचेच नाव हि भूमिका घेऊन एल्गार पुकारला आहे. जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आग्रही भूमिका महत्वाची ठरली. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी दिवंगत दि. बा. पाटील यांच्या आशिर्वादाने त्यांनी सतत ठाम भूमिका मांडली. वेळोवेळी झालेल्या बैठक, मोर्चे, आंदोलनामध्ये त्यांनी ताकद दाखवून दिली. सिडकोने विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्यानंतर गावांच्या सीमारेषेवर ताबा घेण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी वेळोवेळी होत राहिलेल्या सिडकोच्या सर्वेक्षणाला तसेच बांधकाम तोडणीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडाडून विरोध केला. गावठाणाच्या चारही बाजूला २०० मीटर जागा गावासाठी सोडण्याचा ठाम आग्रह केला. नैसर्गिक गरजेपोटी बांधललेली घरे नियमित करा असा आवाज उठवून तशी तरतूद करण्यास शासनाला भाग पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्याचबरोबर सिडको हद्दीतील गावांचा विकास झाला पाहिजे यासाठी सिडकोने गावांना विकासनिधी द्यावा हा आग्रह लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धरला आणि त्या माध्यमातून गावांना विकासनिधी मिळत आहे. त्यामुळे गावांच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान मानले जाते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका कायम राहिली, त्यामुळे न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पात बाधित होणार्‍या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी करण्याबरोबरच त्या संदर्भातील पाठपुरावा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला आणि त्यातून मच्छीमारांना भरपाई मिळाली.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना आणि त्या अनुषंगाने विद्यालये, महाविद्यालयांची अर्थात सर्वसुविधांयुक्त विद्येची पंढरीची उभारणी झाली. विविध प्रकारचे शिक्षण दानाचे काम होत असताना स्थानिक विद्यार्थ्याला विधी शिक्षण घेण्यासाठी मुंबई -पुणे शिवाय पर्याय नव्हता. याची दखल घेत त्यांनी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना विधी चे उच्च शिक्षण घेणे सोयीस्कर झाले. आणि या शिक्षणातून वकिलांची फौज तयार होत आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामध्ये खारकोपर रेल्वे स्टेशनचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे. उलवा परिसरात झपाट्याने विकास होत असताना रेल्वे साधन प्रलंबित राहिली, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने खारकोपर सोबत रेल्वे स्थानक इतर स्टेशनची निर्मिती होऊन त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे निवासस्थान म्हणजे लोकांच्या समस्या सोडविणे, त्यांना आर्थिक मदत देणे यासाठी प्रसिद्धच आहे. पण त्यांनी हे कार्य करतानाच पनवेल शहरासह खांदा कॉलनी, कामोठे, खारघर, उलवा नोड, तळोजा, कळंबोली अशा विविध ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी पक्षाचे जनसंपर्क कार्यालये उभारली. या कार्यलयांच्या माध्यमातून नागरिकांचे समस्या सोडविण्याचे, आणि मार्गदर्शन व मदत करण्याचे काम होत आहे.
महिला वर्गातून छोटे मोठ्या उद्योजिका निर्माण व्हावेत, यासाठी रोजगार प्रशिक्षण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. त्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार सुरु केले. तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करून आजपर्यंत हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अपंगत्वावर मात करण्यासाठी कृत्रिम हात व पाय बसविण्याचे शिबीर अर्थात जयपूर फूट कॅम्पचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून हजारो अपंग व्यक्तींना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले. दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीराचे आयोजन करून सर्वसामान्यांना आरोग्यदायी जीवनाची भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिबिरात दरवर्षी किमान १५ हजार नागरिक लाभ घेत असतात. त्यामुळे आजपर्यंत लाखो जणांना या उपक्रमाचा लाभ झाला. गोर गरीब विद्यार्थ्याने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे या हेतून त्यांनी तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी जवळपास ०२ लाख वह्यांचे वाटप केले जाते. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या स्थापनेपासून हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. अशी एक ना अनेक कामे लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत.

देवदूत : लोकनेते रामशेठ ठाकूर!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -