कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन अर्ज; सर्वसामान्य, आदिवासी बांधवांनी काय करावे?

लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाईन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणिआदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत. मग, समाजातील अशा घटकांनी काय करावे, असा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे कोरोना प्रादुभावाचा वाढता धोका आणि नियोजन्य शून्य लसीकरण मोहिमेमुळे नागरिकांना मोठी डोकेदुखी झाली आहे. लसीचा तुटवडा आणि त्यामुळे बंद पडलेली लसीकरण केंद्रे यामुळे कोरोनाला कसे हरविणार? हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात कायम आहे. लसीच्या तुटवड्याचे नियोजन करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने काढलेली ऑनलाईन अपॉइंटमेंटची पळवाट सर्वसामान्य जनता आणि आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त नाही. कोविड लसीकरणाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून सर्वसामान्य जनता आणिआदिवासी बांधव कोसो मैल दूर आहेत. मग, समाजातील अशा घटकांनी काय करावे, असा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे. पनवेल मनपा क्षेत्रात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहेत. कोविड लसीकरणाची ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रक्रियेपासून ते लांब आहेत. त्यामुळे आदिवासी पाड्यांमध्ये विशेष लसीकरण शिबीर आयोजित करावे, लोकसंख्येनुसार लसीकरण केंद्र वाढवावीत, मॉल पार्किंगमध्ये ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरु करावे.
– निलेश बाविस्कर, नगरसेवक, पनवेल मनपा

नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीधारक आणि आदिवासी बांधव राहतात. एकीकडे कोरोना वाढतोय. कोरोनाची दुसरी लाट अतिघातक ठरत आहे. मरणाचे भय सर्वांना सतावत आहे. आगामी काळात येणारी कोरोनाची तिसरी लाट महाभयंकर असणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञानी वर्तविला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना देखील मोठा धोका आहे. राज्यात आतापर्यंत दीड लाख लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात अडकलेली आहे. भविष्यात हा धोका वाढणार आहे. असे असताना शासनानला कोविड लसीकरण मोहीम अति तीव्र वेगाने राबविण्यात भीरता का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड लसीकरणाची धाकधूक सुरु आहे. कधी १८ ते ४४ वयोगातील लसीकरन सुरु आहे , तर कधी ४५ वरील दुसरा डोस सुरु आहे. त्यामध्ये देखील कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या तुटवड्यामुळे हवा तो डोस उपलब्ध होताना दिसत नाही. अनेक केंद्रांवर कोविशील्डच्या दुसऱ्या डोसची गरज आहे, मात्र तिथे कोवॅक्सीन उपलब्ध असल्याने नागरिकांना घेता येत नाही.पनवेलमध्ये देखील तीच परिस्थिती आहे.

नवी मुंबई मनपा क्षेत्रात झोपडपट्टी भाग मोठा आहे. सर्वसामान्य गरीब जनता येथे राहते. कोविडची परिस्थिती भयंकर झाली कि जीव वाचविणे, महागडा उपचार घेणे गरीब जनतेला परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने थेट झोपडपट्टीत जलदगतीने कोविड लसीकरण राबवून, सर्वसामान्य जनतेला कोविड लसीचे सुरक्षा कवच देण्याची गरज आहे.
– सुरेश कुलकर्णी, ज्येष्ठ नगरसेवक, नवी मुंबई मनपा

कोविड लसीच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या पुरवठा होणाऱ्या तुटपुंज्या लसीच्या डोसमध्ये लसीकरण सुरु आहे, लसी कमी असल्याने ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांना मर्यादित लोकांना लस दिली जात आहे. मात्र, या ऐकून प्रक्रियेत नसलेल्या सर्वसामान्य जनतेने, आदिवासी बांधवांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम सरसकट राबवून कोरोनाला हरविण्याचे, रोखण्याचे एकमेव सुरक्षा कवच नागरिकांना जलदगतीने द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

हेही वाचा –

MPSC EXAM 2021: एपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास आयोगाची तयारी