घरनवी मुंबईनवी मुंबईत उघडी गटारे, तुटलेली झाकणे; पालिका प्रशासनावर आप संतप्त

नवी मुंबईत उघडी गटारे, तुटलेली झाकणे; पालिका प्रशासनावर आप संतप्त

Subscribe

सर्वोत्तम स्वच्छतेचा डंका मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक विभागात समस्यांचा पेटारा भरलेला आहे. अनेक ठिकाणी उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे असल्याचे चित्र असल्याने स्वच्छेतेचे पुरते बारा वाजले आहेत.

सर्वोत्तम स्वच्छतेचा डंका मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक विभागात समस्यांचा पेटारा भरलेला आहे. अनेक ठिकाणी उघडी गटारे आणि तुटलेली झाकणे असल्याचे चित्र असल्याने स्वच्छेतेचे पुरते बारा वाजले आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपले आहेत काय ? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीने केला आहे. नवी मुंबईतील नागरी प्रश्नांकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने दाखल द्यावी, अशी मागणी आपने केली आहे.

नवी मुंबई मनपा हद्दीत कोपरखैरणे नोडमधील प्रभाग क्रमांक ४५, ४२, ३५,२३ मधील नागरी सुविधांकडे प्रशासनाचे, लोक प्रतिनिधींचे काही लक्ष आहे का?, असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. या ठिकाणी गटार आणि इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूशन बोर्डसची भयानक वाईट अवस्था झाली आहे. उघडी गटारे, तुटलेली झाकणे, उघड्या इलेक्ट्रिक केबल्स असे अनेक दुरावस्था झालेले फोटो आम आदमी पार्टीकडे आहे. नुकतंच आपने हे सर्व फोटो विनंती अर्जासह प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

नवी मुंबईत झालेल्या या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी कोपरखैरणे नोडचे वॉर्ड अध्यक्ष अभिषेक पांडे अध्यक्ष वॉर्ड २३, महादेव गायकवाड अध्यक्ष वॉर्ड ४५, नीना जोहरी अध्यक्ष वॉर्ड ४२, सुमती कोटियान अध्यक्ष वॉर्ड ३८ यांनी याबाबतचा अर्ज केला आहे. तसेच याबाबत प्रशासानाकडून त्वरित कारवाई करावी, यासाठी पाठपुरावा करत आहेत.

कोपरखैरणे नोडमधील बरेचसे इलेक्ट्रिकल पॉवर डिस्ट्रिब्युशन बोर्ड्स हे उघडे पडलेले आहे. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आणि धोकादायक आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस आणि पाणी त्यामुळे संभाव्य शॉर्ट सर्किट, आग, अपघात आणि जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी विनंती आपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच बऱ्याच नाल्यांवर झाकण नाही. तर काही नाले हे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यात पावसाळ्यात कचरा अडकून राहतो. त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता असते. तसेच अशुद्ध पाणी भरल्यामुळे आजारही होतात. तसेच अनेकदा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या जर्जर रस्त्यांची, नाल्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल, बॉम्ब शोधक पथक दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -