घरनवी मुंबईनवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील संत निरंकारी महाराज शिल्पाला विरोध

नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील संत निरंकारी महाराज शिल्पाला विरोध

Subscribe

प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाच्या लगत आणि नवी मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पटणी रोड (ऐरोली नॉलेज पार्क) परिसरातील मुख्य चौकात संत निरंकारी मिशनचे प्रमुख सदगुरू हरदेव सिंहजी महाराज यांच्या नावे प्रबोधन शिल्प साकारण्यात आले आहे.

प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाच्या लगत आणि नवी मुंबईचे प्रवेशद्वार असणाऱ्या पटणी रोड (ऐरोली नॉलेज पार्क) परिसरातील मुख्य चौकात संत निरंकारी मिशनचे प्रमुख सदगुरू हरदेव सिंहजी महाराज यांच्या नावे प्रबोधन शिल्प साकारण्यात आले आहे. मात्र या शिल्पाला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी आंदोलन करत या ठिकाणचे निरंकारी महाराजांचे शिल्प हटवून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. २००५ ते २०१४ या कालावधीमध्ये दरवर्षी सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा सत्संगचा कार्यक्रम ठाणे-बेलापूर रोडवरील पटनी कंपनीच्या मैदानात भव्य दिव्य स्वरुपात साजरा होत होता.

या परिसरात निरंकारी मिशनचे अनेक अनुयायी आहेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आयुक्तांना लेखी निवेदन देऊन निरंकारी महाराजांच्या नावे शिल्प बांधण्याची मागणी केली होती. या शिल्पाच्या कामाचे भूमिपूजन २६ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या एन आकाराच्या शांतीच्या संदेशात्मक शिल्पाचे काम काम पूर्णत्वास आले आहे. तर येत्या काही दिवसात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु उद्घाटनापूर्वीच या शिल्पाला विरोधक राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

- Advertisement -

निरंकारी महाराज हे महापुरुषांच्या यादीत नाहीत. त्यांचे महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण योगदान नाही. हे शिल्प उभारण्यासाठी नियमानुसार कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव महासभेत मंजूर केलेला नाही. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला?, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रकाश दिलपाक यांनी उपस्थित केला आहे. दिघा परिसरात मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे समाज बांधव वास्तव्यास आहेत. तर ऐरोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे एकही शिल्प उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या दिघा परिसरातील या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महापुरुषाचा सन्मान महापालिकेने करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रुपेश हाटे, राजेश भालेराव, सागर सोनकांबळे, नितीन बनसोडे, अनिल अंगरख, योगेश शिंदे, संजय वाघ, जितेश धाकडे, रंगनाथ घुसळे आणि छत्रपती संभाजी महाराज रिक्षा चालक संघटनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – 

मुंबई पोलिसांवर माजी पोलीस आयुक्तांचा, अन् महाराष्ट्राचा CBI वर भरवसा नाय, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -