आता ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली सेक्टर ३ येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची कायमस्वरूपी सोय निर्माण झाली आहे.

ऐरोली, दिघा, रबाळे विभागाती नोड, गाव गावठाण, झोपडपट्टी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी उपलब्ध पालिकेच्या ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली सेक्टर ३ येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची कायमस्वरूपी सोय निर्माण झाली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या एक कोटी रूपयांच्या आमदारनिधीतून रूग्णालयातच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. बुधवारी त्याचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. राजमाता जिजाऊ रूग्णालय आता ऑक्सिजन पुरवठ्यात स्वयंपूर्ण बनले असून केवळ कोविड काळातच नव्हे तर ऑक्सिजन पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवी मुंबईची जनता सुजाण आहे. १९९५ पासून ती माझ्या विचारांसोबत आहे. नवी मुंबईचा विकास करण्याची शक्ती जनतेनेच दिली आहे. साडेचार लाख लोकसंख्या असताना आणि आता १५ लाख लोकसंख्या झाल्यावरही जनता आमच्या सोबतच आहे. भविष्यातही नवी मुंबईची जनता आमच्यासोबतच राहणार आहे, अशी आशा यावेळी आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

कोरोना व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजन प्राणरक्षक ठरतो. त्यामुळे त्याला प्राणवायू देखील म्हणतात. शस्त्रक्रिया संदर्भीत रूग्ण, अस्थमाचे रूग्ण, हृदयरोगी, प्रसृती गुंतागुंत, बालकांवर उपचाराप्रसंगी, कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज भासत असते. नवी मुंबईवर धडकलेल्या कोरोनाच्या मागील दोन लाटांमध्ये ऑक्सिजनची मागणी कमालीची वाढली होती. ऑक्सिजनची कमतरता पहाता मुंबईहून ऑक्सिजन आयात करावा लागला होता. ही सर्व परिस्थिती पहाता आमदार नाईक यांनी त्यांचा एक कोटी रूपयांचा आमदारनिधी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी नवी मुंबई महापालिकेला देवू केला होता. या निधीमधून आणि महापालिकेच्या काही निधीमधून पीएसए तंत्रज्ञानावर आधारित १००० एलपीएम क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे. दररोज २०० जम्बो सिलेंडर भरता येतील, एवढी ऑक्सिजन निर्मिती या प्लांटमधून होणार असून प्रतिदिन २०० ते २०५ रूग्णांना वैद्यकीय प्राणवायू पुरविता येणार आहे. राजमाता जिजाऊ रूग्णालयात २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागातील रूग्णांना या प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.

हेही वाचा –

Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य