घरनवी मुंबईशासनाचे नियम मोडून कोरोना रुग्णांची लूट; आयुक्त साहेब, खाजगी केंद्राची मनमानी थांबवा!

शासनाचे नियम मोडून कोरोना रुग्णांची लूट; आयुक्त साहेब, खाजगी केंद्राची मनमानी थांबवा!

Subscribe

महाराष्ट्र शासनाने कोविडसाठी दिलेल्या वैद्यकीय चाचणीचे निकष मोडून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रुग्णांची सर्रास लूट सुरु आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी याबाबत लक्ष घालून संबंधित केंद्रांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मागील वर्षापेक्षा यावर्षी कोरोनाने भयंकर रूप धारण केले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध होणे मुश्किल झाले आहे. कोविड झाला तर योग्यवेळी वेळीच उपचार मिळेल कि नाही याचे भय नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक खाजगी डायग्नोस्टिक सेंटर रुग्णांची फसवणूक करीत असाल्याचा गंभीर आरोप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केला आहे. वैदयकीय चाचणीसाठी अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याची लेखी तक्रार नेत्रा पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्याकडे केली होती . मात्र, आरोग्य विभागामार्फत अद्याप याबाबत दखल घेतली गेली नसल्याने आयुक्त महोदय आता आपणच लक्ष द्यावे, अशी हाक पनवेलकरांनी दिली आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला रक्त तपासणी, सिटी-स्कॅन इत्यादी प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगण्यात येतात. एच.आर.सि.टी. (HRCT) तपासणीसाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार ते अडीच हजार रुपये दर आकारण्यास सांगितले आहेत. मात्र, काही खाजगी डायग्नोस्टिक सेंटर हे रुग्णांकडून ४५०० ते ५००० रुपये घेत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असल्याचे नेत्रा पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अशा वाढीव दर आकारणी करणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व रुग्णांची होणारी आर्थिक लूट त्वरीत थांबण्यात यावी अशी लेखी मागणी आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.


शासनाचे नियम मोडून कोरोना रुग्णांची लूट; आयुक्त साहेब, खाजगी केंद्राची मनमानी थांबवा!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -