Homeनवी मुंबईPanvel News : रस्ता रुंदीकरणातील अडथळे जमीनदोस्त, टपाल नाक्यावर फिरला कारवाईचा जेसीबी

Panvel News : रस्ता रुंदीकरणातील अडथळे जमीनदोस्त, टपाल नाक्यावर फिरला कारवाईचा जेसीबी

Subscribe

पनवेल : रस्ता रुंदीकरणासाठी पनवेल महापालिकेने टपाल नाका येथील अंदाजे 90 वर्षे जुनी धोकादायक एक मजली इमारत जमीनदोस्त केली. शिवाय सहा गाळेही पाडले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन टपाल नाका येथे रस्ता रुंदीकरणाचे काम करणे महत्त्वाचे होते. या कामात सहा गाळे आणि जुनी लाकडी धोकादायक इमारतीचा अडथळा होता.

महापालिका आयुक्त तथा प्रशासन मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त रविकिरण घोडके आणि प्रभाग ड पनवेलच्या सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.

हेही वाचा… Raigad News : हताश बापाचा आत्मदहनाचा इशारा, अलिबागमधील हे प्रकरण जाणून घ्या

या कारवाईच्या वेळी उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर,सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, तसेच प्रभाग अधीक्षक सदाशिव कवठे, प्रभारी अधीक्षक रोशन माळी, प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतूकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

(Edited by Avinash Chandane)