घरनवी मुंबईपनवेल पालिका रुग्णालयातील ‘ओपीडी’ आता रात्री आठपर्यंत

पनवेल पालिका रुग्णालयातील ‘ओपीडी’ आता रात्री आठपर्यंत

Subscribe

पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात रात्री आठ वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा (ओपीडी) सुरू ठेवणार असल्याचे पालिकेने जाहीर केले. यामुळे रात्रीची ओपीडी सेवा देणारी पनवेल पालिका ही राज्यातील ड वर्गातील पहिली पालिका ठरणार आहे.

पनवेल : महापालिका क्षेत्रातील सर्वच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात रात्री आठ वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा (ओपीडी) सुरू ठेवणार असल्याचे पालिकेने जाहीर केले. यामुळे रात्रीची ओपीडी सेवा देणारी पनवेल पालिका ही राज्यातील ड वर्गातील पहिली पालिका ठरणार आहे.
एक हजारांहून अधिक खासगी डॉक्टर पनवेलमध्ये प्रॅक्टीस करतात. पालिकेचे दवाखाने आणि आरोग्य केंद्र दुपारनंतर बंद होतात. त्यामुळे आरोग्याची समस्या असल्यास नोकरदार त्या दिवशी कामावर जातो आणि सायंकाळी खासगी दवाखान्यात जाऊन अडीचशे रुपये देऊन तपासणी करुन घेतो. यावर पनवेल पालिकेचे प्रशासकांनी उत्तम तोडगा काढला आहे.
सध्या खासगी दवाखान्यातील बीएचएमस डॉक्टर तपासणीचे अडीचशे रुपये आणि औषधाच्या दुकानातील चिठ्ठीतून दिलेले औषध तसेच किरकोळ चारशे रुपये किमतीची औषधे लिहून देतात. एका वेळेसाठी सर्दी, ताप व अंगदुखी, डोकेदुखीसारख्या आजारांसाठी नागरिकांना खर्च करावा लागतो.

पनवेल पालिकेची प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्णसेवा सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असते. ती पुढील काही दिवसांत रात्री आठवाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे घोषित केले. ही सेवा नागरिकांना देण्यासाठी बाह्यस्त्रोतातून वैद्यकीय आरोग्य अधिकारी व आरोग्यसेवक घेऊन पालिका क्षेत्रातील नोकरदारांसाठी रात्री आठ वाजेपर्यंत बाह्य रुग्णसेवा सुरू राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -