घरनवी मुंबईPOLICE : नवी मुंबई पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी; गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी...

POLICE : नवी मुंबई पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी; गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढली गुन्ह्यांची उकल

Subscribe

नवी मुंबई : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाढते सायबर गुन्हे, अंमली पदार्थ आणि महिला सुरक्षेसाठी जागरुक नवी मुंबईकर अभियान त्याचप्रमाणे सायबर गुन्हे नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली आहे. 2023 हे वर्ष नवी मुंबई पोलिसांची कामगिरी उंचावणारे असले, तरी काही गुन्ह्यांना अद्याप आळा घालण्यात यश आले नाही. सन 2022मध्ये दाखल 6443 गुन्हयांपैकी 4297 गुन्हे उघडकीस आणले होते, तर सन 2023 मध्ये 6656 दाखल गुन्हयांपैकी 4892 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. (POLICE Commendable performance of Navi Mumbai Police Crime solving has increased by 6 percent compared to last year)

हेही वाचा – Daya Nayak : ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ला मिळाली बढती; मुंबईतील 22 अधिकाऱ्यांना पदोन्नती

- Advertisement -

गुन्हे शोधाचे 2022 मध्ये 67 टक्के असणारे प्रमाण 2023 मध्ये 6 टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे नवी मुंबईला अमंली पदार्थाचे रॅकेट पोलिसांनी मोडून काढण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषद घेत सन 2023 चा वार्षिक लेखालोखा प्रसिध्दी माध्यमांसमोर मांडला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट सीटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईत मागील काही वर्षांपासून वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत आहे. मात्र सोनसाखळीच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी मोबाइल फोन चोरी, ऑनलाइन फसवणुकीचा आलेख वाढत आहे. त्यावर पोलिसांना नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

- Advertisement -

सन 2022मध्ये सायबरचे 207 गुन्हे घडले होते, तर 2023 मध्ये 403 गुन्हे दाखल झाले आहे. पोलिसांनी तपास करून 303 गुन्ह्यांमधील 33.83 कोटी, तर एनसीसीआरपी पोर्टलवरून 7091 तक्रारीमध्ये 67.71 कोटीं रक्कमेच्या फसवणुकीतील 6.78 कोटी रुपये बँकेत गोठवले आहेत. याशिवाय नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांविरोधात दंड थोपाटले आहेत. आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी 2023 या वर्षामध्ये अंमली पदार्थांशी संबंधित एकूण 290 गुन्हे दाखल करून 353 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात 7 महिलांसह 37 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा – Maratha Vs OBC : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; शिंदे गटातील दोन आमदारांची मागणी

वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृती केली आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहिमेत 1345 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायद्यानुसार 7 लाख 86 हजार 396 केसेस दाखल करून 14 कोटी 36 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भारंबे यांनी दिली. याशिवाय नवी मुंबईत अवैद्यरित्या प्रवेश करून वास्तव्यास राहणार्‍या झिब्बाम्बे, लायबेरिया, नायझेरीया, केनिया टांझानिया व इतर देशातील 23 परकीय नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे.

नवी मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असली तरी तपासातही वाढ झाली आहे. मोहिमेत अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करणे, अमंली तस्करी पुर्णत: आटोक्यात आणणे, नागरिकांना देणार्‍या सुविधा प्रभावीपणे राबविणे, महिला सुरक्षा, सागरी सुरक्षा तत्पर करणे यावर भर असणार आहे. नवी मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आगामी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी महिती मिलिंद भारंबे यांनी दिली.

प्रभावी तंत्रज्ञानाचा आधार

प्रशासकीय कामकाजासाठी एम पोलीस अ‍ॅप, दोष सिद्धीसाठी ई-पैरवी व आय बाईक, गुन्हे व अर्ज निर्गतासाठी नेल्सन प्रणाली, अपघात मृत्यू पंचनामाकरीत यथार्थ प्रणालीसारख्या प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करून नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे तपासात वाढ केली आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या आधारे अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांनी यश मिळत असून त्यांनी इतर राज्यातील जाळे मोडीत काढले आहे.

जागरुक नवी मुंबईकर अभियान

सन 2023 मध्ये जागरुक नवी मुंबई अभियानांतर्गत 627 ठिकाणी महिला सुरक्षा, अमंली पदार्थ, सायबर सुरक्षा विषयक चित्रफित, ऑनलाईन सेमीनर, सोशाल मिडीया, पोलीस संवाद, महिला सहाय्य कक्ष या विभागाकडून 23 हजार नागरिकांना जागृत केले आहे.

हेही वाचा – Babanrao Taywade : ओबीसीत फूट? भुजबळ, वडेट्टीवार दिशाभूल करतायत; तायवाडेंच्या आरोप

गुन्ह्यांचा 2023 मधील अहवाल

  1. शरीराविरुध्द – एकूण गुन्हे 825, उघड गुन्हे 807 प्रमाण – सरासरी 98 टक्के ट
  2. मालमत्तेविषयक – एकूण गुन्हे 2348, उघड गुन्हे 1170 – सरासरी 50 टक्के
  3. आर्थिक फसवणुक – एकूण गुन्हे 812, उघड गुन्हे 462 – सरासरी 57 टक्के
  4. महिला विषयक – एकूण गुन्हे 703, उघड गुन्हे 689 – सरासरी 98 टक्के
  5. इतर गुन्हे – एकूण गुन्हे 1968, उघड गुन्हे 1764  – सरासरी 90 टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -