घरनवी मुंबई मुंबई विभागात रायगड अव्वल; निकाल ९०.५३ टक्के 

 मुंबई विभागात रायगड अव्वल; निकाल ९०.५३ टक्के 

Subscribe

मुंबई विभागात रायगड जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के इतका लागला आहे. यातही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होण्याची त्यांची टक्केवारी ९३.५९ इतकी आहे. तर ८७.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. जिल्ह्यातून ३१ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी २८ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल तळे तालुक्याचा ९७.३० टक्के इतका लागला असून दोन नंबरवर पनवेल आहे. पनवेलचा ९६.५३ इतका निकाल लागला आहे. सर्वांत कमी निकाल मुरुड तालुक्याच ८१.२८ इतका लागला आहे.

अलिबाग: मुंबई विभागात रायगड जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्याचा निकाल ९०.५३ टक्के इतका लागला आहे. यातही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होण्याची त्यांची टक्केवारी ९३.५९ इतकी आहे. तर ८७.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. जिल्ह्यातून ३१ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी २८ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल तळे तालुक्याचा ९७.३० टक्के इतका लागला असून दोन नंबरवर पनवेल आहे. पनवेलचा ९६.५३ इतका निकाल लागला आहे. सर्वांत कमी निकाल मुरुड तालुक्याच ८१.२८ इतका लागला आहे.

जिल्ह्यातील निकालाची तालुका निहाय टक्केवारी
पनवेल: ९६.५३; उरण: ९३.२४; कर्जत: ८६.३८; खालापूर: ८२.९३; सुधागड: ८२.४२; पेण: ८९.६७; अलिबाग: ९१.४१; मुरुड: ८१.२८; रोहे: ९२.६५; माणगाव: ९४.६२; तळे: ९७.३०; श्रीवर्धन: ९४.५३; म्हसळे: ९४.७५; महाड: ८७.५१; पोलादपूर :८८.२१.

- Advertisement -

पनवेल, उरणमध्ये मुलींची सरशी
पनवेल विभागाचा निकाल ९६.५३ टक्के इतका लागला असून उरण विभागाचा निकाल ९३.२४ टक्के इतका लागला आहे. पनवेलमध्ये ५५८७ मुले आणि ४९८१ मुली असे १० हजार ५०८ विद्यार्थ्यांपैकी ५५८९ मुले आणि ४९०५ मुलीनी प्रत्यक्षात परिक्षा दिली. त्यामधून ५३२७ विद्यार्थी आणि २७७४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. उरणमधून ९९९ मुले आणि १००६ मुली असे २००५ विद्यार्थ्यांनी रजिस्टेशन केले होते. त्यापैकी ९९६ मुले १००२ मुली यांनी प्रत्यक्षात परिक्षा दिली. ८९३ मुले आणि ९७० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पनवेल आणि उरणमध्येही मुलीनीच बाजी मारली आहे.

वेदांत आंबवणेचे विज्ञान शाखेत यश
चौक: रिलायन्स फाऊंडेशन स्कुल लोधिवली या कनिष्ठ महाविद्यालया चा वेदांत संजय आंबवणे हा विद्यार्थी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याचे अभिनंदन होत आहे.
वेदांत संजय आंबवणे हा चौक गावचा विद्यार्थी असून रिलायन्स फाऊंडेशन लोधिवलि येथे १२ वी विज्ञान शाखेतून परीक्षा देऊन ८४.१७ टक्के गुण मिळउन शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे चौक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.पुढेa आपण आय.टी.क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.आपल्याला आई बाबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले असे सांगितले. विद्या प्रसारणी चौक या शिक्षण संस्थेच्या यशवंतराव देशमुख कला आणि वाणिज्य शाखेचा निकाल ७१.८५ टक्के लागला आहे. महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखा मिळून १३५ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली होती. त्यातून ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पूजा कोळी ८१.८३ टक्के, सुभाष माने ८१.६७ टक्के, रुक्मिणी देवाशी ७९.१७ टक्के, सपना राठोड ७५.५० टक्के, गिरीष सकपाळ ७५.५० टक्के, साक्षी शिगवण ७०.१७ टक्के हे विद्यार्थी प्रथम पाच =मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक भोमले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

मुरुड जंजिरात मुलींचा डंका
मुरुड: मुरुड जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस. ए. हायस्कूल आणि स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या निकालात तिन्ही शाखेत मुलीचा डंका दिसून आला.
कला शाखेत ४६.०७ टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक: कोमल पाटील ६९.५० टक्के, द्वितीय: संस्कार पाटील ७३.५० टक्के , तृतीय: रोहन हातचांगे ६०.३३ टक्के टक्के गुण मिळाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९१.८० टक्के लागला. यात प्रथम क्रमांक सेजल खोत ८९.५० टक्के , द्वितीय : विश्वम पोतदार ८७ टक्के तर तृतीय: प्रणव पाटील याला ८४.८३ टक्के गुण मिळाले . बँकिंग शाखेचा निकाल १००टक्के लागला असून प्रथम क्रमांक हर्षाली नरेश पाटील ६८.६७ टक्के, द्वितीय : ताहीर एजाझ उलटे ६४ टक्के, तृतीय : सुरज आग्रावकर ६१.८३टक्के गुण मिळाले असुन या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.

ि क्रश जैन मुरुड तालुकातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
मुरुड: अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी क्रिश जैन याने विज्ञान शाखेत ७८.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर अंजुमन इस्लाममधील विज्ञान शाखेतील चापेकर अमरीन अमानुल्लाह हिने ७४.१७ टक्के गुण प्राप्त होऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे.टाके मुइझ मुशाररिफ याला ७२.३३ टक्के गुण मिळाले आहेत.अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी पास झाले आहेत.कला शाखेत ६६ विद्यार्थ्यांपैकी ५१ पास झाले आहेत. या विद्यालतील टाके सानिया अझीम हिला कला शाखेत ६९.८३ टक्के मिळाले आहेत.सना खातून रफिक ६७.८३ टक्के मार्क मिळाले आहेत.तर घलटे नूरीन नौशाद हिला ६३.३३ टक्के गुण मिळाले आहेत.

पोलादपुरात ८८ .१७ टक्के निकाल
पोलादपूर: बारावी परिक्षेचा पोलादपूर केंद्राचा निकाल ८८ं.१७ टक्के लागला असून केंद्राअंतर्गत ३१३ विद्यार्थी बारावी परिक्षेस बसले होते. त्यापैकी २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ५९ पैकी ५२ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल ८८ .१३ टक्के लागला आहे.कला शाखेच्या ९४ परिक्षार्थींपैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७०. ५९ टक्के लागला. वाणिज्य शाखेच्या ५० परिक्षार्थींपैकी ४८ परिक्षार्थीं उर्तीर्ण झाले असून निकाल ९६टक्के लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -