घरनवी मुंबईराज ठाकरेंमुळे ७८४९ सिडको सोडतधारक कुटुंबांचे वाचले ४८० कोटी

राज ठाकरेंमुळे ७८४९ सिडको सोडतधारक कुटुंबांचे वाचले ४८० कोटी

Subscribe

सिडको सोडतधारकांसाठी सदर क्षण त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. सिडको सोडतधारकांनी या विषया संदर्भात राज ठाकरे यांना भेटण्याची विनंती केली असता ते काही दिवसात नवी मुंबईत येणार, असे सांगितले आहे. त्यामुळे सोडतधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज ठाकरे नवी मुंबईत आल्यावर सोडतधारक राज साहेब ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार करणार आहेत.

नवी मुंबई-: सिडकोच्या माध्यमातून उलवे-बामणडोंगडों री येथील ७,८४९ सिडको सोडतधारकांना ३५ लाख रुपये किंमतीच्या घरांचे दर कमी करावे म्हणून ‘नवी मुंबई मनसे’ने गेली १० महिने ‘सिडको’शी लढा दिला. (‘Navi Mumbai MNS’ fought with ‘CIDCO’ for the last 10 months) अखेर या लढयाला यश आले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे सोडतधारकांना दिलासा मिळाला आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयात पुढाकार घेवून ते स्वतः या सिडको सोडतधारकांना भेटायला नवी मुंबईत आले. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेताना सर्वसामान्यांना हक्काचे आणि परवडणारे घर मिळावे म्हणून राज ठाकरे यांनी सिडको सोडतधारकांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासमोर सदरचा ज्वलंत प्रश्न मांडला.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नासंदर्भात संवेदनशीलता दाखवत ‘सिडको’ला तसे निर्देश दिले. त्यानुसार ‘सिडको’च्या माध्यमातून येथील घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रति घरामागे ६ लाख रुपये कमी करुन आज २७ लाख रुपयांना ‘सिडको’चे घर प्रत्येकाला मिळणार आहे. यामुळे गोरगरीब सिडको सोडतधारकांचे जवळपास ४८०
कोटी रुपये वाचले आहेत, अशी माहिती नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.

‘मनसे’च्या सदर पत्रकार परिषद प्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, सचिव सचिन कदम, विलास घोणे, सहसचिव दिनेश पाटील, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, महिला सेना शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, बेलापूर विभाग अध्यक्ष भूषण कोळी, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, अक्षय भोसले, सुहास मिंडे, श्याम ढमाले, गणेश भवर, महिला सेना शहर सहसचिव सायली कांबळे आणि सोडतधारक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -