घरनवी मुंबईऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात बालकांसाठी वरदान

ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात बालकांसाठी वरदान

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे. आयुक्तांच्या प्रयत्नामुळे राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील अद्ययावत असा नवजात शिशू विभाग हा नवजात बालकांसाठी वरदानच ठरला आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे. आयुक्तांच्या प्रयत्नामुळे राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील अद्ययावत असा नवजात शिशू विभाग हा नवजात बालकांसाठी वरदानच ठरला आहे.
ऐरोली परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून त्यामुळे याठिकाणी अतिजोखमीची प्रकृती असणार्‍या माता प्रसूतीचे प्रमाण जास्त आहे. त्यानुसार ३ सप्टेंबर २०१९ रोजी १२ बेड्स व्यवस्थेचा नवजात शिशू विभाग  रुग्णालयात सुरु झाला. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.वर्षा राठोड यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल देशमुख व डॉ.सचिन बिरादार यांनी नवजात शिशू विभाग कसा असावा याचे सूक्ष्म नियोजन केले. परिसेवक प्रकाश बारवे यांनी निवडलेल्या परिचारिकांना केईएम व ज्युपिटर या मानांकित रुग्णालयातून प्रशिक्षण दिले.
मागील ३ सप्टेंबर २०१९ पासून ३१ डिसेंबर २०२२ या तीन वर्षात १०५३ प्रसूती झाल्या असून याठिकाणी सर्वात कमी वजनाचे व कमी दिवसांचे प्रिमॅच्युअर बाळ हे २६ आठवड्यांमध्ये जन्मलेले ७५० ग्रॅम वजनाचे होते. हे बाळ एनआयसीयू मध्ये ७३ दिवस होते. त्यावर सुयोग्य उपचार केल्यामुळे या बाळाची सर्व वाढ व विकास योग्यरितीने झाला असून हे बाळ आज ३ वर्षांचे झाले आहे.

तिळे जन्मले ३१ आठवड्यांमध्ये 
विशेष म्हणजे या रुग्णालयात एक तिळेही जन्माला आले असून ही तिळी ३१ आठवड्यांमध्ये जन्मली होती. त्यांचे वजन अनुक्रमे १.४ कि.ग्रॅम होते. यापैकी एका बाळाला पिन्युमोथोरॅक्स हा गंभीर आजार होता. त्यावरही नवजात शिशू विभागाच्या वैद्यकीय समुहाने शल्य चिकित्सक डॉ.सागर होटकर यांच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या उपचार केला व ही तिन्ही बाळे ४९ दिवस एनआयसीयू मध्ये उपचार घेऊन सुखरूप घरी गेली.

- Advertisement -

बेड्सची संख्या १२ वरून १७
नवजात शिशू विभागात बेड्सची संख्या १२ वरून १७ करण्यात आली असून चार  व्हेन्टिलेटर्स, मल्टिपॅरामॉनिटर, सिरींज पंप, फोटो थेरपी मशीन, बिलीमिटर अशी अद्ययावत उपकरणे त्याच प्रमाणे नवजात शिशूंवर म्युझिक थेरपीव्दारे उपचार केले जात आहेत. डॉ.अमोल देशमुख हे एनआयसीयू विभागाचे प्रमुख यांच्यासमवेत डॉ.पंडीत जाधव, डॉ. सचिन बिरादार, डॉ.निलेश आनंद, डॉ.मुकुंद शिरोळकर, डॉ.शिल्पा भोईटे, एनआयसीयूच्या नर्सिंग इंन्चार्ज नलिनी झेंडे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत.
===

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -