रेराच्या विकास परिषदेची तीन महिन्यांतून बैठक; अध्यक्ष अजोय मेहतांची माहिती

नवी मुंबई विकासक आणि ग्राहक यांच्यातील संबंध दृढ व्हावेत, घर खरेदी विक्रीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी महारेराच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी नियुक्त केलेल्या उपसमितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना प्रकल्पाची माहिती उपलब्ध करून देणे विकसकांना बंधनकारक आहे, असे प्रतिपादन महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी केले आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई विकासक आणि ग्राहक यांच्यातील संबंध दृढ व्हावेत, घर खरेदी विक्रीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी महारेराच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी नियुक्त केलेल्या उपसमितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना प्रकल्पाची माहिती उपलब्ध करून देणे विकसकांना बंधनकारक आहे, असे प्रतिपादन महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी केले आहे.
’नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ने ’रेरा अपडेटस अ‍ॅण्ड इनसाईटस’ या विषयावर वाशी येथे एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजोय मेहता बोलत होते. बांधकाम उद्योगाला संरक्षण देण्याबरोबरच ग्राहकांचे हित जपणे ही महारेराची प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे विकासकांनी महारेराच्या नियमावलीचे कठोर पालन करायला हवे. त्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा विकास परिषदेच्या सहकार्याने कार्यशाळा घेण्याबाबत अनेकांनी विचारणा केली आहे. हा उपक्रम योग्य असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असेही मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजन बांदलकर, उपाध्यक्ष डॉ.निरंजन हिरानंदानी आदीसह महारेराचे नोडल अधिकारी, विकासक आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.