घरनवी मुंबईशिवसेनेच्या विभाग प्रमुखाला मारहाण; माजी नागरसेविकेविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेच्या विभाग प्रमुखाला मारहाण; माजी नागरसेविकेविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

नवी मुंबईत सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. त्यामुळे इच्छुक आपले प्रभाग सांभाळण्यात व मतदारांना खुष करण्यात व्यग्र आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये देखील एकमेकांवर शाब्दिक चिखलफेकीच्या घटना घडू लागल्या आहेत.

नवी मुंबईत सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. त्यामुळे इच्छुक आपले प्रभाग सांभाळण्यात व मतदारांना खुष करण्यात व्यग्र आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये देखील एकमेकांवर शाब्दिक चिखलफेकीच्या घटना घडू लागल्या आहेत. नवी मुंबईत समाजमाध्यमांवर गद्दार म्हंटल्याबद्दल व भाजपच्या कार्यक्रमात शामिल झाल्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली. या कारणावरून शिवसेनेच्या बेलापूर दिवाळे गावातील माजी नकरसेविका भारती कोळी यांनी थेट शिवसेनेच्या विभाग प्रमुखालाचा मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामुळे शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीच्या स्क्रिनवरील वेळेनुसार ही घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी भारती कोळी यांच्याविरोधात एनआरआय पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती कोळी या दिवाळे गावातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. तर प्रकाश आमटे हे शिवसेनेचे बेलापूरमधील विभाग प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यातर्फे दिवाळे गावाला दत्तक घेत हे गाव स्मार्ट व्हिलेज बनवण्यात येणार असल्याने ‘स्मार्ट व्हिलेज’ या केंद्र शासनाच्या संकल्पनेवर आधारित भूमीपूजनाचा व काही कामाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप आमदार गणेश नाईक, आमदार रमेश पाटील उपस्थित होते. यावेळी स्थानिक नगरसेविका म्हणून भारती कोळी यांना देखील आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार भारती कोळी उपस्थित होत्या. मात्र त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना न रुचल्याने विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी पक्षातील वरिष्ठांकडे याबाबत त्यांच्या उपस्थितीचे पुरावे पाठवले. त्यासोबत समाजमाध्यमांवर देखील भारती कोळी व प्रकाश आमटे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

- Advertisement -

या गोष्टीचा राग ठेवत भारती कोळी यांनी प्रकाश आमटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र ते घरी उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांच्या सहकाऱ्याच्या कार्यालयात भारती कोळी व त्यांचे सहकारी पोहोचले. प्रकाश आमटे हे कार्यालयाबाहेर आल्यावर थेट त्यांना कोळी व त्यांच्या सहकऱ्यांकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आमटे यांनी कोळी यांच्याविरोधात एनआरआय पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका; जितेंद्र आव्हाडांची हात जोडून विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -