घरनवी मुंबईसायन-पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळला

सायन-पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळला

Subscribe

नवी मुंबई-: मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागांना जोडणार्‍या सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा ते नेरुळ, खारघर मार्ग एलईडी दिव्यांनी उजळला आहे. (Sion-Panvel-Highway illuminated with LED lights) सुमारे दीड वर्षांपासून सायन-पनवेल महामार्गावरील डागडुजीच्या कामाबरोबरच विद्युत रोषणाईच्या अनुषंगाने कामे सुरु होती. महामार्गावरील बहुतांशी विद्युत दिव्यांची कामे पुर्ण झाली असून हा महामार्ग सध्या पांढर्‍या शुभ्र दिव्यांनी उजळल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला असून खड्डयामुळे होणार्‍या अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

२५ किमी लांबीचा सायन-पनवेल एक्स्प्रेसवे २०१४ मध्ये वापरासाठी खुला झाल्यापासून मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा एक प्रमुख दुवा ठरला आहे.सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची सेवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना अनेकदा दिवाबत्ती बंद पडल्याने वाहन चालक आणि रस्ता ओलांडणारे पादचारी यांना नाहक त्रास होत होता. इतकेच नव्हे तर लांबून भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाचा अंदाज न आल्याने अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला होता. वाढत्या अपघातामुळे पोलिसांची चिंता देखील वाढली होती.पालिकेने स्वच्छतेच्या अनुषंगाने नियोजन करताना केलेल्या मागणी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महापालिकेकडे विद्युत विषयक सेवा हस्तांतरीत केली होती. त्याचबरोबर दिवाबत्ती दुरुस्तीसाठी ९ कोटी रुपये दिले होते. त्यानुसार महापालिकेने १ हजार ३०० दिवाबत्ती (केवळ फिटींगटीं) बदलणे, ३० हायमास्ट लावणे, ४ जीपीआरएस पिलर बसवणे आणि ५ वर्ष देखभाल करणे अशी कामे हाती घेतली होती.मागील दीड वर्षापासून महामार्गावरी रस्ते, डागडुजीची करणे व विद्युत विभागाशी संबंधीत कामे सुरु होती.

  • सदर ठिकाणी रस्ते, चौक, उड्डाण पुलावर रोषणाईची कामे पुर्ण झाल्याने सायन-पनवेल महामार्गावरील खारघर, जुईनगर-नेरुळ, कामोठे-कळंबोली मार्ग हा सध्या पांढर्‍या दिव्यांनी उजळला आहे.येत्या तीन महिन्यात विद्युत रोषणाईची उर्वरीत कामे पुर्ण करणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
  • या ठिकाणी विशेष प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत दिवे आटोमॅटिक डिम होणार असल्याने ३० टक्के विजेची बचत होणार आहे. पूर्वी सोडियम व्हेपरचे ४०० वॅटचे ४ दिवे एका खांबावर होते. आता त्यापेक्षा अधिक प्रकाश देणारे २५० वॅटचे ४ एलईडीचे दिवे लावण्यात आले आहेत. सोडियम व्हेपरपेक्षा एलईडीच्या दिव्यांना अल्प वीज लागते. यामुळे विजेच्या देयकात प्रतिमास सुमारे ९ लाख रुपयांची बचत होणार असून वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -