घरनवी मुंबईदोन कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी

दोन कोटी रुपये किंमतीच्या मांडूळ सापाची तस्करी

Subscribe

तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

दोन कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी आज दुपारी खारघर येथे सापळा रचून अटक केली. हस्तगत करण्यात आलेल्या सापाची लांबी १५२ सेमी असून वजन ५ किलो २४० ग्राम इतके आहे.
पोलीस खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडूळ सापामुळे धनदौलत आणि ऐश्वर्य प्राप्त होते. असे आमिष लोकांना दाखवून किशोर गोविंद पाटील ही व्यक्ती लोकांना मोठ्या किंमतीत मांडूळ सापाची विक्री करून लोकांची फसवणूक करते. ही व्यक्ती मांडूळ जातीचे सर्प विक्री करण्यासाठी खारघर येथील द क्राऊन बिल्डिंग जवळ येणार आहे, अशी माहिती पोलीस खबरीकडून खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती. या सापाची किंमत २५ कोटी रुपये सांगितली असल्याची माहिती खबरीने पोलिसांना दिली होती.

त्यानुसार, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी तातडीने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी सध्या वेशात द क्राऊन बिल्डिंग परिसरात सापळा रचला. दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी एक ४० वर्षीय इसम खारघर सेक्टर १५ येथील द क्राउन बिल्डिंगच्या जवळ आला असता पोलीस खबरीने पोलिसांना हीच ती व्यक्ती असल्याचा इशारा केला. या व्यक्तीला पोलिसांचा अंदाज येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

- Advertisement -

पोलिसांनी त्याच्याकडील मांडूळ साप हस्तगत केला. या सापाची लांबी १५२ सेमी असून ५ किलो २४० ग्राम वजन आहे. त्याची बाजारभावाप्रमाणे 2 कोटी रुपये किंमत आहे. द क्राऊन बिल्डिंग मधील ऑफिस क्रमांक १००४ मध्ये मांडूळ साप विक्री करून मिळालेल्या रकमेतून ही व्यक्ती हॉटेल व्यवसाय सुरू करणार होतो, अशी कबुली आरोपीने दिली. आरोपी हा भिवंडी तालुक्यातील दलोंडे या गावातील रहिवासी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -