Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई मिस नवी मुंबईच्या बाराव्या पर्वासाठी सौंदर्यवती सज्ज

मिस नवी मुंबईच्या बाराव्या पर्वासाठी सौंदर्यवती सज्ज

Subscribe

प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी जी मानली जाते ती अर्थातच मिस नवी मुंबई आपल्या बाराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट ने बारा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्यस्पर्धा नवी मुंबईमध्ये आयोजित करावी. बारा वर्षाच्या या प्रवासातील अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणार्‍या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.

नवी मुंबई: प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी जी मानली जाते ती अर्थातच मिस नवी मुंबई आपल्या बाराव्या पर्वात पदार्पण करीत आहे. यू अँड आय एंटरटेनमेंट ने बारा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितले होते की जागतिक दर्जाची सौंदर्यस्पर्धा नवी मुंबईमध्ये आयोजित करावी. बारा वर्षाच्या या प्रवासातील अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट व सर्वात प्रतिष्ठित बनली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रात पदार्पण करणार्‍या सुमन राव, दिव्या अग्रवाल,अक्षता सोनवणे, कविता मिश्रा या सौंदर्यवतींनी देश व जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला आहे.
अंतिम फेरीमध्ये दाखल झालेल्या सोळा सौंदर्यवतींमध्ये प्रणिता गावंडे, अश्विन कौर कोहली, शायना शिराझी, सलोनी गोल्लर, सोनाली चव्हाण, मेघा भोगले, नेहा भदौरिया, मिहिका नायक, साक्षी विसावे, शशी भदौरिया, रिया राज, श्रध्दा कटकधोंड, नेहा वर्मा, रवितनया शर्मा, दिया राचलवार, श्रुती काजळे हिचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार ४ मार्च २०२३ रोजी वाशीच्या फॉर फोईन्ट्स मध्ये संपन्न होईल.
आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणे व जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे सोपे नाही. प्रथम फेरीत शेकडो सहभागी स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट सोळा सौंदर्यवतीं निवडणे खूप कठीण आहे. निवडलेल्या सौंदर्यवतींना यू अँड आय टिमच्या वतीने उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाते, असे यू अँड आय एंटरटेनमेंटचे हरमीत सिंग यांनी सांगितले.
नवी मुंबई च रूपांतर एका ग्लॅमर शहरात करण्याच्या उद्देशाने आम्ही सौंदर्यववतींच्या कलागुणांना वर्षानुवर्षे अशी अप्रतिम संधी देऊ शकलो, असे एंटरटेनमेंट चे अध्यक्ष सुरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -