घरनवी मुंबईऐरोलीत साकारणार मुख्यमंत्री शिंदेंच्या संकल्पनेतील शिवस्मारक

ऐरोलीत साकारणार मुख्यमंत्री शिंदेंच्या संकल्पनेतील शिवस्मारक

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार भूमीपूजन@ऐरोली सेक्टर १० मधील पाच हजार स्केवर फुट भुखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरीत झाला आहे. शहराचे प्रवेशद्वार असणार्‍या ऐरोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारण्यात येणार असल्यामुळे नवी मुंबईची आयकॉनिक म्हणून ओळख होणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे भुमीपूजन होईल.स्मारकांसाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला असला तरी सहा महिन्यात स्मारक तयार करण्यात येईल.- विजय चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख

नवी मुंबई-: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३६ फुटी उंच भव्य पुर्णकृती पुतळा आणि शस्त्र, नाणी, त्या काळातील मोडी लिपीतील पत्र, शिवकालीन इतिहासाची माहिती देणारे दालन राज्यातील पहिले भव्यदिव्य स्मारक ऐरोलीतील सेक्टर-१० भुखंड क्रमांक-२० येथे साकारणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारीणी प्रदेश सदस्य तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्या प्रयत्नाने हे शिवस्मारक साकारणार आहे. या शिवस्मारकाची जिल्हाप्रमुख विजय चौगुले पाहणी करुन त्याच्या कामाचे पूजन केले. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात येणार आहे.(36 feet tall full size statue of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Hindu Swarajya From the concept of Chief Minister Eknath Shinde)

शिवस्मारकाच्या पाहणी व पूजन कार्यक्रमा प्रसंगी युवानेते ममित चौगुले,शहर प्रमुख सुरेश भिल्लारे,माजी नगरसेवक आकाश मढवी,बहाद्दूर बिष्ट,रवी पाटील,बंडू केणी,औटी आणि महिला व शिवसेने पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 

१३ कोटीहून अधिक खर्च
वाशी येथे शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. त्याच धर्तीवर ऐरोलीतही शिवप्रेमीसाठी पुतळा आणि शिवकालीन इतिहास जागा करणारे शिवस्मारक व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नवी मुंबई महापालिकेने या शिवस्मारकासाठी १३ कोटी ६५ लाख ८४ हजार ५६२ खर्चाची तरदूत केली आहे.२५ फेब्रुबारी २०२६ या २४ महिन्यांच्या कालावधीत याचे कामपुर्ण करायचे आहे.मे.स्वस्तिक इन्फ्रालॉजिक्स प्रा.लि.या कंपनीला याचे काम देण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील व एमएमआर क्षेत्रातील पहिलेच भव्यस्मारक
३६ फूट उंच शिवरायांचा भव्य पुतळा हा चरणस्पर्श करुन नतमस्तक होता येईल असा असणार आहे. या स्मारकाची भिंत व पायर्‍यांचा दगड हा कोल्हापूर हुन बनवून मागविण्यात येणार आहे.तसेच गड किल्यांवरील मातीचा स्पर्श या स्मारकास अनुभवता येणार असल्याने राज्यातील व एमएमआर क्षेत्रातील पहिलेच भव्यस्मारक म्हणून याची नोंद होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -