घरनवी मुंबईमेवा तिथं थवा, अरं चला येऊ द्या हवा; सुषमा अंधारे यांची भाजपा-शिंदे...

मेवा तिथं थवा, अरं चला येऊ द्या हवा; सुषमा अंधारे यांची भाजपा-शिंदे गटावर टीका

Subscribe

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली मेवा तिथं थवा असे शिंदे गटाची परिस्थिती असून आपण कोणत्याही आमिषाला आणि दहशतीला बळी पडणार नसल्याचे सांगत चला हवा येऊ द्या असा प्रयोग सुरू असल्याचे अंधारे म्हणाल्या.

नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाप्रबोधनयात्रा सुरू करण्यात आली आहे. आज नवी मुंबईत देखील उद्धव ठाकरे गटाचा जाहीर मेळावा भावे नाट्यगृहात पार पडला, यावेळी मार्गदर्शन करताना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका करत मेवा तिथं थवा, असे शिंदे गटाची परिस्थिती असून, आपण कोणत्याही आमिषाला आणि दहशतीला बळी पडणार नसल्याचे सांगत चला हवा येऊ द्या, असा प्रयोग सुरू असल्याचे अंधारे म्हणाल्या.

या मेळावात खासदार शिवसेने नेते अरविंद सावंत, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई शिवसेना प्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपाचा भारतीय संविधानाची चौकट पुसण्याचा डाव आहे, असा आरोप केला. पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. महाप्रबोधन यात्रेतून महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे हा उद्देश आहे. सध्या सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र चेपला जातोय. भाजपाला विरोधी पक्ष संपवायचा असून, देशाला हुकूमशाहीकडे न्यायचे आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी देखील धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायची या गद्दारांची लायकी नसल्याचा आरोप केला. यांना पद मिळेल पण प्रतिष्ठा मिळणार नाही, असे देखील सुनावले. शिंदे गटाचे केसरकर हे नवे बोलके पोपट आहेत. पक्ष बदलणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये, असा केसरकरवर हल्लाबोल केला. तर 2014 पासून शिवसेनेच्या आमदारकीच्या जागा कमी करून सेना संपवण्याचा डाव भाजपाने सुरू केला आहे. भर सभेत राजीनामा देणारे आज त्यांच्या माडीवर जाऊन बसले, असा देखील एकनाथ शिंदेंवर अरविंद सावंतांनी घणाघात केला.

- Advertisement -

विचारेंचे शिंदेंना खुले आवाहन
राज्यातील भूकंपाचे केंद्र बिंदू ठाण्यात होते. काही दिवसांपूर्वी ठाण्यात भरगच्च गर्दीत झालेल्या महाप्रबोधन यात्रेचा गद्दाररांनी धसका घेतला आहे. त्यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत पाठवून वार करण्यापेक्षा समोर येऊन लढा असे थेट आवाहन ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -