घरनवी मुंबईस्मार्ट सिटीत फ्लेमिंगोचे थवे दाखल, पर्यटकांची गर्दी वाढली

स्मार्ट सिटीत फ्लेमिंगोचे थवे दाखल, पर्यटकांची गर्दी वाढली

Subscribe

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोडलेल्या सिमेंट क्राँकिटच्या जंगलामध्ये १६ हजार ९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या पाणथळ जागेत पसरलेल्या ठाणे खाडी परिसरातील ऐरोलीच्या संवेदनशील क्षेत्राची फ्लेमिंगो अभयारण्यासाठी निश्चिती करण्यात आली आहे.

कच्छच्या रणातून नवी मुंबईत फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे थवेच्या थवे दाखल झाले आहेत. या फ्लेमिंगोमुळे ठाणे खाडी, ऐरोली खाडी, सिवूडस एन आर आय कॉम्प्लेक्स आणि टी एस चाणक्यशेजारी असलेले होल्डिंग पाँडवर गुलाबी चादर पांघरल्याचा भास होऊ लागला आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोडलेल्या सिमेंट क्राँकिटच्या जंगलामध्ये १६ हजार ९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या पाणथळ जागेत पसरलेल्या ठाणे खाडी परिसरातील ऐरोलीच्या संवेदनशील क्षेत्राची फ्लेमिंगो अभयारण्यासाठी निश्चिती करण्यात आली आहे. ठाणे खाडीपूल परिसरातील २६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात.फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनार्‍यावर दरवर्षी आश्रयाला येतात. यात पेटंट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी परदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. या खाडीतील विविध प्रकारची जैवविविधता आणि खाडी किनार्‍यांचे महत्त्व, किनार्‍यांचे संरक्षण कसे करावे, पक्षी नरीक्षक आणि पर्यावरण यांची माहिती होण्यासाठी किनारी व सागरी जैवविविधता केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांनाही सफर घडविण्यात येत आहे. वन विभागाच्यावतीने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या या केंद्रात परदेशी विद्यार्थीही पर्यटक म्हणून दाखल होत आहेत. तसेच शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थी मोठया प्रमाणात पक्षी निरीक्षणासाठी येत आहेत. मात्र, पालिका शाळांमधील िविद्यार्थ्यांची संख्या त्या प्रमाणात कमी असल्याने या विद्यार्थ्यांनाही यात सामावून घेण्यासाठी ही नि:शुल्क बससेवा सुरू आहे.या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना सागरी पट्टा, कांदळवन, इतर जैवविविधतेची माहिती देण्यासाठी संग्रहालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासाठी खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जातो, तर शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत प्रवेश दिला जातो. शासकीय म्हणजेच पालिका शाळेतीलविद्यार्थ्यांना व्यापक स्वरूपात सामावून घेण्यासाठी वन विभागाने आता मोफत बससेवा देखील सुरु केली आहे. पालिका शाळेनी मागणी केल्यांनतर ही बससेवा पुरावण्यात येते.

यंदा हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली आहे. मात्र, आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोची उपस्थिती वाढली असल्याने पक्षी प्रेमी येथे दिसून येत आहेत. कोरोना निर्बधमुक्ती झाल्यामुळे पुर्ण क्षमतेने पर्यटक कांदळवन कक्षांकडे येत आहे. तर जवळपास महिनाभरांच्या बोटिंग सफरीसाठी बुकींग झाले असल्याचे कांदळवन कक्षांच्या आधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

या केंद्रात परदेशी विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तसेच शहरातील खासगी शालेय विद्यार्थीदेखील या केंद्राला भेट देत आहेत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत केंद्र आहे. फ्लोमिंगो बोट सफारीसाठी जवळपास महिनाभराची बुकींग झालेली आहे.
-एन. जे. कोकरे, वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग ऐरोली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -