घरनवी मुंबईपत्नीचा छळ करणार्‍या गजानन काळेवर कडक कारवाई करा - शिवसेनेच्या नेत्या नीलम...

पत्नीचा छळ करणार्‍या गजानन काळेवर कडक कारवाई करा – शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे

Subscribe

समाजात सभ्यपणाचा टेंबा मिरवत घरामध्ये आपल्या पत्नीची क्रूरपद्धतीने छळवणूक करणारा मनसेचा शहराध्यक्ष गजानन काळे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

समाजात सभ्यपणाचा टेंबा मिरवत घरामध्ये आपल्या पत्नीची क्रूरपद्धतीने छळवणूक करणारा मनसेचा शहराध्यक्ष गजानन काळे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जवळपास सात दिवस उलटून गेले आहेत. तरीही काळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करून त्याला लकरात लवकर अटक करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नवी मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे काळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

मनसेचा शहराध्यक्ष गजानन काळे याच्या विरोधात त्याच्या पत्नी संजीवनी काळे यांनी शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. काळे हा फक्त मनसेचा शहराध्यक्षच नाही तर तो दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा बेलापूर मतदारसंघातील उमेदवार होता. गजानन आणि संजीवनी यांचे लग्न झाले तेव्हापासून तीन वर्षे काळे हा बेकार होता. कुठेही नोकरी आणि व्यवसाय करत नव्हता. त्यानंतर त्याने पालिका अधिकारी ठेकेदार यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात करून कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली, असे आरोप संजीवनी यांनी केले आहेत. काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सात दिवस उलटले असले तरी त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे हा प्रकार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून काळेला लवकर अटक करण्याची सुचना केली आहे.

- Advertisement -

गजानन काळे याने अत्यंत क्रूरपणे आपल्या पत्नीची छळवणूक केली आहे. संजीवनी यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. मात्र हा गुन्हा दाखल होऊन सात दिवस उलटले तरी गजानन पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या दडी मारून बसण्यामुळे संजीवनी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला तातडीने अटक करण्यात यावी, अशा सूचना आपण पोलिसांना दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सोमवारी नवी मुंबईच्या दौर्‍यावर आले होते. त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी पोलीस आयुक्तालाच्या प्रवेशद्वारावर जमा झाल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना मंत्र्यांना भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्या आक्रमक झाल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. नंतर या महिला पदाधिकार्‍यांनी वळसे पाटील यांना भेटून काळेवर कारवाई करण्याची मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा –

भारत आमच्यासाठी मोठा भाऊ; अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -