Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई तळोजेत परिसरात फिरणार्‍या हेलिकॉप्टरची चर्चा

तळोजेत परिसरात फिरणार्‍या हेलिकॉप्टरची चर्चा

Subscribe

तळोजे परिसरात सध्या एका हेलिकॉप्टरची चर्चा आहे.काही तरी साहित्य लटकावलेल्या अवस्थेत दिवसभरात दहा ते पंधरा फेर्‍या मारणार्‍या या हेलिकॉप्टरचे दर्शन सध्या तळोजा परिसरातील आकाशात होत असल्याने हेलिकॉप्टर लटकावलेले साहित्य नक्की काय आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते वाहून नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर का केला जातोय, असे प्रश्न तळोजे परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

पनवेल: तळोजे परिसरात सध्या एका हेलिकॉप्टरची चर्चा आहे.काही तरी साहित्य लटकावलेल्या अवस्थेत दिवसभरात दहा ते पंधरा फेर्‍या मारणार्‍या या हेलिकॉप्टरचे दर्शन सध्या तळोजा परिसरातील आकाशात होत असल्याने हेलिकॉप्टर लटकावलेले साहित्य नक्की काय आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते वाहून नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर का केला जातोय, असे प्रश्न तळोजे परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. तर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने साहित्याची वाहतूक केली जात असल्याचे पहिल्यांदाच पाहणार्‍या काही जुन्या जाणत्यांच्या मनात पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शस्त्रास्त्र फेकण्यात आल्याच्या १९९५ सालच्या घटनेच्या आठवणी या मुळे ताज्या झाल्या.

लोखंडी साहित्याची वाहतूक?
नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला असता पनवेल परिसरातील डोंगर रागांमध्ये सध्या टाटा पावर कंपनीच्या उच्च दाबाच्या वाहिन्या वाहून नेण्यासाठी वापरात येत असलेल्या टॉवरचे काम सुरु असून, या टॉवरसाठी लागणार्‍या लोखंडी साहित्याची वाहतूक या हेलिकॉप्टरमधून केली जात असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -