वाशीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह

वाशी येथे स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर २९ येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुढीची पूजा करुन शोभायात्रेचा शुभारंभ झाला.

बेलापूर : वाशी येथे स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर २९ येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुढीची पूजा करुन शोभायात्रेचा शुभारंभ झाला. माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नववर्ष स्वागतयात्रा समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा पंडित, उत्सव प्रमुख सागर मटकर,माजी नगरसेवक शशिकांत राऊत, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, माजी नगरसेविका सुनंदा राऊत आदि मान्यवर या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेत पारंपारिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने नवी मुंबईकर या शोभायात्रेत सहभागी झाले होते. एमजीएम कॉम्प्लेक्स, सेक्टर १४,वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे शोभायात्रेचा समारोप झाला.