घरनवी मुंबईलसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाख पार

लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाख पार

Subscribe

देशात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली असून सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झालेली असून सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोविड लसीकरणावर विशेष लक्ष देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने नियोजनबद्ध पावले उचलण्यात येत असून लसीकरण केंद्रांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत ३४ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. तसेच जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर जलद लसीकरणासाठी ५० पेक्षा अधिक नवीन लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ३ लाख ८९ हजार ६६५ नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील १ लाख ९९६ नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशाप्रकारे एकूण ४ लक्ष ९० हजार ६६१ कोविड लसीचे डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

सध्या शासन स्तरावरून महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यानुसार दररोजच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून त्यास नागरिकांच्या माहितीसाठी सोशल माध्यमांचा वापर करून व्यापक प्रसिद्धी दिली जात आहे. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना किमान १ डोस देऊन व्हावा, असे नियोजन करण्यात आले असून लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी ४ लाख लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे ८ जून २०२१ पर्यंत एकूण ३ लक्ष ८९ हजार ६६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील १ लाखाहून अधिक नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोसही घेतलेला आहे. कोविडची लस पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी कोविड लस घेऊन आपल्याला संरक्षित करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मिलिंद देवरांकडून गुजरातच्या CM चे कौतुक, ट्विटमुळे चर्चांना उधाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -