घरनवी मुंबईमुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल- मंत्री नितीन गडकरी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल- मंत्री नितीन गडकरी

Subscribe

: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी खारपाडा टोल प्लाझा येथे केले.एकूण ६३. ९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४. ६८ कोटी रुपये खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझाजवळ पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते.

पनवेल: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी खारपाडा टोल प्लाझा येथे केले.
कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२. ३००कि.मी. आणि खर्च २५१. ९६ कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि खर्च १२६. ७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८. ६० कि.मी. आणि खर्च ३५. ९९ कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण ६३. ९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४. ६८ कोटी रुपये खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल प्लाझाजवळ पार पडला. यावेळी गडकरी बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर उद्योजक जे.एम.म्हात्रे, पी. डी. देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन यशवंत घोटकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी केले.

मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा
भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी त्यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल. १२०० कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि १ हजार १४६ कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले श्री.गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे श्री.गडकरी म्हणाले,

- Advertisement -

महामार्गाचे ११ टप्प्यांत बांधकाम, रुंदीकरण

मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील ६६ पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत. आता महामार्गाचे ११ टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले.

- Advertisement -

रस्ते किमान ५० वर्षे टिकतील

जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल” असा विश्वास व्यक्त करून त्यांनी राज्य सरकारांना ६ ते ८ इंच टॉपिंग असलेले रस्ते बनविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले, जेणेकरुन हे रस्ते किमान ५० वर्षे टिकतील, तसेच दुरुस्तीसाठी कमी खर्च येईल. भारतात वर्षाला ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यापैकी दिड लाख प्राणघातक असतात, त्यापैकी बरेच जण १८ ते ३४ वयोगटातील मृत पावतात. हे त्रासदायक आहे. याबाबत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून अपघातांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -