घरनवी मुंबईतीस हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अनुदानाची प्रतिक्षा

तीस हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अनुदानाची प्रतिक्षा

Subscribe

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना नोंदणीकृत बांधकाम कामगाराना महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने प्रत्येकी कामगारांना पंधराशे रुपये अनुदान जाहीर केले आहे.

पनवेल, उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ३० हजार हुन अधिक बांधकाम कामगार शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू करताना नोंदणीकृत बांधकाम कामगाराना महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने प्रत्येकी कामगारांना पंधराशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. रायगड जिल्यात ३० हजार ४६० कामगार असून किती कामगारांना लाभ मिळणार याकडे कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.

इमारत व बांधकाम कामगारांची नोंदणी करताना बँक खाते,आधार कार्ड,रेशन कार्ड तसेच ज्या ठिकाणी कामगार काम करतात. त्या ठेकेदार अथवा बांधकाम बिल्डरकडे ९० दिवस काम केल्याचे पत्राची मागणी करतात. ठेकेदार आणि बिल्डर पत्र देत नाही. अनेक कामगारांकडे रेशन कार्ड नसतात. त्यामुळे कामगार असूनही नोंदणी केली जात नाही.
– राजू वंजारे, कामगार एकता युनियन, युवा संस्था खारघर

- Advertisement -

कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना घटकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील बारा लाख नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगारांना बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले. त्यात मुंबई क्षेत्रात रायगड जिल्यातील पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. मात्र विविध सामाजिक संघटना आणि कामगार आयुक्त कार्यालयाच्या जनजागृतीमुळे जिल्यात केवळ ३० हजार ४६० कामगाराची नोंद झाली आहे. मागील वर्षी कोरोना काळात राज्य शासनाच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून केवळ ८ हजार ७१ कामगारांना प्रत्येकी पाच हजाराचा लाभ मिळाला होता.या वर्षी किती कामगारांना लाभ मिळेल याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी कोरोना काळात बांधकाम व इतर कामगारांना बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत रायगड जिल्यात महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून ८ हजार ७१ कामगारांना दोन आणि तीन असे दोन हप्त्यात प्रत्येकी पाच हजाराचा लाभ मिळाला होता.या वर्षी शासनाच्या नियमानुसार लाभार्थीची माहिती माहिती पुरविली जणार आहे. त्यामुळे किती कामगारांना पंधराशे रुपयांचे अनुदान मिळतील हे आता सांगता येणार नाही.
– प्रदीप पवार, उपायुक्त कामगार कार्यालय, पनवेल

- Advertisement -

कामगार कार्यायाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्यात ३० हजार ४६० कामगाराची नोंदणी झाली आहे. नोंदणीकृत कामगारांना ओळखपत्र दिले जाते. दरवर्षी कामगारांना कामगार कार्यालय अथवा ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र बहुतांश वेळी कामगार ज्या साईटवर काम करतात तेथील काम समाप्त झाल्यावर इतर ठेकेदाराकडे जावून काम करतात. तसेच काही कामगारांना नूतनीकरण विषयी माहिती होत नाही. त्यामुळे नोंदणी असूनही नूतनीकरण न केल्यामुळे कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळत नाही. कामगार तसेच विविध सामाजिक संस्था कामगार ठेकेदारांनी कामगाराची नोंदणी www.mahabocw.in या वेबसाईटवर करू शकता. अथवा अधिक माहितीसाठी पनवेल येथील उपायुक्त कामगार कार्यालयातील ०२२२ ७४५२८३५ या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, वीटभट्टी कामगार हे बांधकाम इमारत व इतर कामगारांत मोडत नसल्यामुळे शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजने पासून वंचित राहत असे, जिल्हा अधिकारी निधी चौधरी आणि कामगार उपआयुक्त कार्यालयाने शासनांकडे पत्र व्यवहार करून वीटभट्टी कामगाराना बांधकाम कामगार मध्ये वीटभट्टी कामगारांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे जिल्यातील २८० वीटभट्टी कामगारांची नोंदणी झाल्यामुळे कोरोना काळात शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ वीटभट्टी कामगाराना मिळणार आहे.

हेही वाचा –

राज्य सरकारने याचिका दाखल करायला हवी होती पण केंद्र सरकारने केली, चंद्रकांत पाटलांची टीका

तीस हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अनुदानाची प्रतिक्षा
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -