घरनवी मुंबईपनवेलमधील टोईंग कर्मचारी मस्तवाल

पनवेलमधील टोईंग कर्मचारी मस्तवाल

Subscribe

वाहतूक विभागाकडून टोईंग व्हॅनवर नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करत असून, दुचाकीवर फिरून चारचाकी वाहनाना जामर लावणारे हे कर्मचारी परस्पररित्या तोडपाणी करून नियमांची मोडतोड करत असल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मस्तवाल कर्मचार्‍यांविरोधात वाहतूक विभागाचे अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पनवेल: वाहतूक विभागाकडून टोईंग व्हॅनवर नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करत असून, दुचाकीवर फिरून चारचाकी वाहनाना जामर लावणारे हे कर्मचारी परस्पररित्या तोडपाणी करून नियमांची मोडतोड करत असल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मस्तवाल कर्मचार्‍यांविरोधात वाहतूक विभागाचे अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील अरुंद रस्ते, वाहन तळाचा अभाव या कारणाने शहर आणि वाहतूक कोंडी हे एक प्रकारचे समीकरण ठरले आहे.कोंडीचे हे समीकरण सोडवण्यात शहर वाहतूक विभागाला आता पर्यंत अपयशच आले आहे. यासाठी अपुर्‍या कर्मचार्‍यांची संख्या हे कारण दिले जात असल्याने वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांना मदतनीस देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता.मात्र काही कारणास्तव हा प्रस्ताव प्रत्यक्षात येणे शक्य झालेले नाही अशातच मग जागा मिळेल त्या ठिकाणी वाहन उभी करून वाहतूक कोंडीला निमंत्रण देणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाकडून खासगीटोईंग व्हॅनची नेमणूक करण्यात आली आहे.टोईंग व्हॅनवर कार्यरत असलेले खासगी कर्मचारी शहरातील विविध भागात फिरून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत आहेत. मात्र कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेले हे खासगी कर्मचारीच वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांना अंधारात ठेऊन परस्पर तोडपाणी करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकांना सोडण्याचे काम करत आहेत.

तोडपाणी करा अथवा त्रास सहन करा
वाहन तळ उपलब्ध नसल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर सम – विषम तारखेनुसार वाहन उभी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या नंतरही जे वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात अशा चार वाहनांवर टोविंग कर्मचारी कारवाई करतात. चार चाकी जामर लावण्याचे काम हे कर्मचारी करतात.जामरवर वाहतूक विभागाचा संपर्क क्रमांक असतो. या क्रमांकावर संपर्क साधला असता वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यांकडून टोईंग व्हॅनवरील खासगी कर्मचार्‍याला घटनास्थळी पाठवण्यात येते. अशा वेळी वाहन चालकाने दंडाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्यास संबंधित कर्मचार्‍याकडे पावती पुस्तकं नसल्याचे कारण देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्यास सांगण्यात येते. मात्र त्याच वेळी तोडपाणी करण्याची तयारी दर्शवल्यास संबंधित कर्मचारीच दंडाच्या रक्कमेतून मध्यममार्ग काढून बिना पावती तोडपाणीची रक्कम स्वीकारून जामर काढण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

मॉल प्रशासनाला पाठिशी
खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील ओरिओन मॉलमध्ये जिल्ह्यातील अनेक भागातून ग्राहक येत असतात. मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी मोफत वाहन तळ उपलब्ध करून देण्याचा नियम असताना मॉल प्रशासन वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावावर पैसे उकळत असल्याने अनेक वाहन चालक मॉल शेजारील जास्त रहदारी नसलेल्या रस्त्यावर वाहन उभी करतात. मात्र रहदारी नसलेल्या या रस्त्यावरही वाहतूक विभाग कारवाई करत असल्याने या ठिकाणी कारवाई करून वाहतूक विभाग मॉल प्रशासनाला पाठीशी घालत जातंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -