Maharashtra Assembly Election 2024
घरनवी मुंबईAPMC Market News : एपीएमसी भाजीपाला बाजारात चालायलाही जागा नाही!

APMC Market News : एपीएमसी भाजीपाला बाजारात चालायलाही जागा नाही!

Subscribe

भाजीपाला बाजाराच्या चारही बाजूंनी व्यापारी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. बाजार समिती याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. सुरक्षा रक्षक आणि बाजार समिती अधिकारी यांच्या संगनमताने हा भोंगळ कारभार होत असल्याचा आरोप होत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला घाऊक बाजारात गाळ्याच्या बाहेरील मालाची चढ-उतार करण्याच्या जागेत गाळेमालक राजरोजसपणे मालाच्या विक्रीसाठी बेकायदा बस्तान मांडून बसत आहेत. सकाळच्या वेळी येथे व्यापाऱ्यांची माल विक्रीसाठी चढाओढ लागते. याशिवाय चहा, खाद्यपदार्थ विक्रते ही यात आणखी भर टाकत आहेत. ग्राहकांना चालण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. मालवाहतुकीचाही प्रश्न डोके वर काढत आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह माथाडी कामगार व मजूर यांना यातून मार्ग काढत जावे लागत आहे.
हेही वाचा –Mahavikas Aaghadi : निकालाआधीच मविआची रणनीती; मुंबईतील हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात
तुर्भे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथील भाजीपाला बाजारासाठी ए, सी, डी आणि इ असे विभाग नेमून देण्यात आले आहेत. ए आणि इ हे विभाग घाऊक बाजारासाठी तर सी आणि डी हे किरकोळ व्यापारासाठी वापरले जातात. येथील ए विभागातील गाळाधारक सकाळच्या वेळी मालाची चढ-उतार करण्यासाठी असलेल्या जागेत माल ठेवत आहेत तर डी विभागातील गाळाधारक या जागेत माल विक्री करत आहेत. मालाच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांची चढाओढ लागते. एका गाळ्यात सहा ते सात जण व्यापार करत आहेत. चहा, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचाही त्यात समावेश असतो. त्यामुळे ग्राहकांना चालणेही मुश्कील होते. त्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत. मजुरांना डोक्यावर माल घेऊन चालायला जागा नसल्याचे कामगार सांगतात.
हेही वाचा –Cholesterol : या भाज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल होते कमी
बाजारात रोज हजारोंच्या संख्येने गाड्यांची ये-जा होत असते. येथील रस्त्यांवर माल विक्री करून रिकामे कॅरेट ठेवले जात आहे. रस्त्यावर कॅरेटच्या थप्पी लागत आहेत. ट्रकचालकांना गाड्या वळवण्यासाठीही त्रास होत आहे.
Edited by :Dnyaneshwar Jadhav
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -