Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर नवी मुंबई हवामानातील बदलामुळे वाशी बाजारात भाज्या महागल्या

हवामानातील बदलामुळे वाशी बाजारात भाज्या महागल्या

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्याची आवक स्थिर असली तरी उन्हाचा पारा चढल्याने भाज्यांचे भाव आतापासून वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.बाजारात गवारला प्रति किलो ७० रुपये अधिक भाव मिळत आहे. टोमॅटो पुन्हा ४० रुपयांवरुन २० रुपये किलोने विकला जात आहे.

नवी मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्याची आवक स्थिर असली तरी उन्हाचा पारा चढल्याने भाज्यांचे भाव आतापासून वाढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.बाजारात गवारला प्रति किलो ७० रुपये अधिक भाव मिळत आहे. टोमॅटो पुन्हा ४० रुपयांवरुन २० रुपये किलोने विकला जात आहे.
तुर्भे येथील एपीएमसी बाजारात बाजारात ६६५ भाजीपाल्यांच्या गाडयांची आवक झाली आहे. तर फळ बाजारात कलिंगड, काळी व हिरवी द्राक्षे, परराज्यातील सफरचंदाची दैनंदिन आवक देखील वाढली आहे. सध्या ऐन फेब्रुवारी महिन्यात मे महिन्यासारखा सारखा वाढलेला पारा तर रात्री सकाळी असणारा हवेतील गारवा याचा फटका नाशवंत भाज्यांना बसल्याने भाज्याचे भाव वाढल्याचे घाऊक भाजी विक्रेत्यांनी सांगितले. येत्या महिनाभर हवामान बदलाची स्थिती अशीच राहिल्यातर कडक उन्हाळयापुर्वीच भाज्यांचे दर पुन्हा वाढतील त्याच प्रमाणे मार्च ते मे महिन्यात भाजी पाल्याचे पीक कमी उत्पादीत केले जात असल्याने भाव वाढतील, असे व्यापारी अशोक शेळके यांनी माहिती देताना सांगितले.
एपीएमसीच्या घाऊक बाजारात मेथी १६ रुपये, कांदापात १५ रुपये, शेपू २० रुपये, शिमला मिरची २५ रुपये, मटार २५ रुपये, भेंडी ४५ रुपये, गवार ७० रुपये,कोबी १० रुपये, फ्लॉवर १२ रुपये, टोमॅटो १८ ते २० रुपये,कोथींबीर २० रुपये जुडीच्या दरानेे विकली जात आहे.

लिंबाला ३०० रुपये शेकडयाचा भाव
फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवडयापासून हिवाळयाच्या शेवटार्धात थंडी ऐवजी उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी लिंबू पाणी, रसाळ फळे, ज्युसची मागणी वाढू लागली आहे. शहरातील अनेक रस्त्यावर लिंबू पाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. एपीएमसीत ३०० रुपये शेकडयाने लिंबू विकला जात आहे. लिंबाचे दर वाढल्याने १० रुपये ग्लास असणारे लिंबू पाणी १२ ते १५ रुपयांनी विकले जात असते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -