घरनवी मुंबईदिवाळीच्या पहिल्याच दिवशी २७ टन कचरा संकलित

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २७ टन कचरा संकलित

Subscribe

पालिकेच्या स्वच्छ दिवाळी मोहिमेचे स्वागत

नवी मुंबई-:पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या ’स्वच्छ भारत अभियान-२.०’ अंतर्गत ’स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ या अभियानानुसार विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अर्थात लक्ष्मीपूजन दिनी पहाटे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत २७ टन ७०० किलो कचरा संकलित (27 tons of 700 kg of waste collected) करण्यात आला आहे.

दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जातात त्यामुखे रस्त्यावरील कचर्‍यात नेहमीपेक्षा अधिक भर पडते. स्वच्छतेवर भर देत लक्ष्मीपूजनाच्या रात्री पालिका परिसरात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व उपायुक्त डॉ.बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

  • मुख्य रस्ते, बाजारपेठा, चौक, वर्दळीची ठिकाणे येथे पहाटे १ ते ५ या कालावधीत राबविलेल्या साफसफाई मोहिमेत हार, फुले, खाद्यपदार्थांचा ९ टन ६०० किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके, कागद, पुठ्ठे, कापडाचा १८ टन १०० किलो सुका कचरा गोळा करून एकुण २७ टन ७०० किलो तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
  • आयुक्त नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविल्याने सकाळी मॉर्निग वॉक करणार्‍या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -