Homeनवी मुंबईBhangarwala : भंगारवाल्यांच्या डोक्यावर कुणाचा हात, परप्रांतीय भंगारवाल्याचे मोकळ्या जागांवर धंदे

Bhangarwala : भंगारवाल्यांच्या डोक्यावर कुणाचा हात, परप्रांतीय भंगारवाल्याचे मोकळ्या जागांवर धंदे

Subscribe

अलिबाग : नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात अनेक मोकळ्या जागावर भंगारवाल्यांनी दुकाने थाटली आहे. कुणीही यावा, कुठल्याही जागेवर भंगाराचा धंदा करावा हे सगळे राजरोजपणे सुरू असल्याने या भंगारवाल्यांच्या डोक्यावर कुणाचा हात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष बहुतांश भंगारवाले परप्रांतीय आहेत. पेण तालुक्यातील एका भंगारवाल्याकडे जेएसडब्लू कंपनीतून चोरलेले स्टील बार सापडल्याने भंगारवाल्यांची मदार नक्की कुणावर आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, महाडसह इतर तालुक्यांत तसेच नवी मुंबई पोलिसांच्या अख्तारित पनवेल, उरणमध्ये परप्रांतीय भंगारवाल्यांचे प्राबल्य वाढताना दिसत आहे. काही भंगारवाले रस्त्याकडेची जागा संबंधित शेतकरी किंवा मालक यांच्याकडून भाड्याने घेऊन व्यवसाय थाटत आहेत. तर काही मोकळ्या जागेवर बेधडक भंगाराचा ढिग उभा करताना दिसत आहेत. उरण, पनवेलमध्ये सिडकोच्या जागांवर भंगारवाल्यांनी बस्तान बसवल्याचे दिसून येत आहे. काहींनी नवघर भेंडखळ गावानजीक रस्त्यांचे फुटपाथ गिळंकृत केल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  Rj Simran : दोन वर्षांपूर्वी सोडलेली नोकरी, 4 महिन्यांनी करणार होती लग्न, पण…; RJ सिमरन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे

त्यानंतरही सिडकोच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे लक्ष गेलेले दिसत नाही. सिडको क्षेत्रातील बेकायदा भंगारवाल्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल विचारला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा…  NCP Ajit Pawar: 18-18 दिवस खंडणी-हत्येतील आरोपी मोकाट कसा राहू शकतो? अजितदादांच्या आमदारांचा संतप्त सवाल

पेणच्या जेएसडब्ल्यू प्रकल्पातील ट्रान्सपोर्टरच्या ट्रेलर चालकांनी त्यांच्याकडील लोखंडी बार भंगारवाल्याला दिल्यानंतर फोफावलेल्या भंगारवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगड पोलीस आणि नवी पोलीस अशा गल्लोगल्ली बेधडक धंदा करणाऱ्या भंगारवाल्यावर कारवाई का करत नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. उरण शहरात तर सरकारी जागेवर भंगारवाल्यांनी मिनी कुर्ला उभारला आहे. तरीही त्यांच्यावर अजिबात कारवाई होत नाही. एका भंगारवाल्याच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीमुळे गोदामाजवळ असलेल्या एका स्थानिकाचे घर जळून लाखोंचे नुकसान झाले होते. त्यानंतरही त्या भंगारवाल्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -