घरनवी मुंबईरेल्वे स्थानकाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार?

रेल्वे स्थानकाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार?

Subscribe

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थनकांमध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) च्या माध्यमातून करण्यात येत आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थनकांमध्ये दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. रेलकॉन इन्फ्रास्ट्रकचर या ठेकेदारांकडून हे काम करण्यात येत आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रत्यक्ष या कामाला सुरुवात झाली. तर मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामामध्ये येणारे अडथळ्यामुळे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची कमतरता तर संथगतीने सुरु असणार्‍या कामामुळे मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास एमआरव्हीसीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

दिघा रेल्वे स्थानकांचे कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. त्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी म्हणजे ७ मे २०१८ रोजी या प्रकल्पाला प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आल्यांनतर या ठिकाणी दिघा रेल्वे स्थानकाचा फलक उभारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती.

- Advertisement -

दिघा रेल्वे स्थानकांच्या आरखड्यामध्ये बदल करण्यात आला व निविदा प्रक्रियो उशीर झाल्यामुळे ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. तर १११ कोटी रुपये खर्च करुन उभ्या करण्यात येणार्‍या दिघा रेल्वे स्थानकांचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रस्तावित दिघा रेलवे स्थनकांच्या ठिकाणी असणारे झाडे, भूमिगत विद्युत वाहिन्या, महानगर गॅस वाहिन्या यांच्या कामाचा अडथळा आला होता. या अडथळ्यांमुळे सबवेचे काम करणे बाकी होते. त्यातच मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जारी झाल्यांनतर कामगारांची कमतरता यामुळे काम पुढे गेले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित असताना आता मार्च २०२२ पर्यंत काम होणार असल्याचे एमआरव्हीसीच्या आधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अजून जवळपास तब्बल एक वर्ष दिघा रेल्वे स्थानकांमध्ये लोकल थांबायला वेळ लागणार आहे. तर दिघा रेल्वे स्थानक साकरल्यांनतर दिघा रेल्वे स्थानकांमुळे ऐरोली नॉलेज पार्कमधील आयटी पार्क, विटावा, गणपती पाडा, आनंद नगर, दिघा, विष्णुनगर येथील रहिवाशांना याचा उपयोग होणार आहे.

हेही वाचा –

भिवंडीत एका नवरीकडून नवरोबांच्या फसवणुकीच्या लग्नाची पाचवी गोष्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -