घरनवी मुंबईनवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणत त्याने थेट नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर त्या तरुणानं डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

आज नवी मुंबई पोलीस आयुक्तलयासमोर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली येथील तरुणाने नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यासमोरच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी त्याला वेळीच थांबवल्याने तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करता आले. दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात एकच खळबळ पहायला मिळाली.

नितीन रांजणे असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो माथाडी कामगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली येथील नितीन रांजणे या माथाडी कामगाराची विनयभंगप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. मात्र मला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप त्याने केला आहे. खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणत त्याने थेट नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर त्या तरुणानं डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतले. मनपा निवडणुकीत अडसर नको म्हणून अडकवले जात असल्याचे नितीन रांजणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी या तरुणाला अडवून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या नितीन रांजणे हे माथाडी कामगार असून, पोलिसांवरही दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. नितीन रांजणे याला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी करीत आहेत.


हेही वाचा – करीमलालाच्या नातेवाईकाला नवी मुंबईतून अटक, लाखोंचे ड्रग्स जप्त 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -