घरनवरात्रौत्सव 2022कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंग गडावर लाखो देवीभक्त

कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंग गडावर लाखो देवीभक्त

Subscribe

सप्तशृंगगड : देवीच्या साडेतीन शक्तिपिठांमध्ये अधिष्ठान असलेल्या श्री सप्तशृंगी देविच्या गडावर रविवारी (दि.9) कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीभक्त व कावडधारकांचा जनसागर लोटला. कोजागरी पौर्णिमेला देवीच्या गडावर कावड धारकांबरोबरच तृतीयपंथी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सप्तशृंगगड परिसर भक्तीमय झाला. सकाळी 8 वाजेपासून कावडी धारकांसह भाविकांनी शिवालय तीर्थावर एकच गर्दी केली. सकाळी भगवतीची महापूजा देणगीदार भाविक तुषार पाटील व किसन बल्लाळ यांनी केली. मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याने सकाळी पायर्‍यामध्ये 15 ठिकाणी बार्‍या लावून भाविकांना मंदिरात टप्याटप्याने सोडण्यात येत होते.

गावात पोलीस स्टेशन, दुबे गल्ली, भवानी चौक, धर्मार्थ दवाखाना, गुरुदेव आश्रम मार्ग व पहिली पायरी असे अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मार्फत नियोजन करण्यात आले. या बार्‍यांमुळे चौकातील सर्व व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले.यावेळी कळवण तहसीलदार तथा संस्थेचे विश्वस्त बी. ए. कापसे, ललित निकम, भुषणराज तळेकर, ट्रस्ट कर्मचारी सामाजिक कार्यकर्ता संदीप बेनके, विजय दुबे, अजय दुबे, गिरीष गवळी, राजेश गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, प्र. विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, तहसीलदार बंडू कापसे, यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

- Advertisement -
भाविकांना प्रसाद

सप्तशृंग नियावैनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. जवळपास दुपारपर्यंत 30 ते 35 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कावडधारकांना दुपारी 12 वाजेनंतर देवीच्या अभिषेकासाठी शिप्रा, तापी, नर्मदा, गोदावरी, प्रवरा, मुळा, गिरणा आदी सप्तनद्यांचे पविञ नद्यांचे जल देण्यात आले.

तृतीयपंथीयांचा जागर

कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंग गडावर तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह, गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचा समावेश होता. देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -