घरताज्या घडामोडीAryan khan drugs- प्रभाकर साईल -होलसेल भाजीवाला, बॉडीगार्ड ते एनसीबी पंच

Aryan khan drugs- प्रभाकर साईल -होलसेल भाजीवाला, बॉडीगार्ड ते एनसीबी पंच

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे तुरुंगात असलेला बॉलीवूड किंग शाहरुखचा खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन केव्हा मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. तर दुसरीकडे याप्रकरणात राजकारण्यांकडून रोज नवीन खुलासे होत असल्याने लोकांमध्ये एनसीबीच्या कार्यपद्धतीवर संभ्रम निर्माण झाला आहे. याचदरम्यान, एनसीबीचा पंच किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने याप्रकरणात २५ कोटींचे डील झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे.तसेच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना यातील ८ कोटी देण्यात येणार असल्याचा बॉम्ब टाकत साईलयाने याप्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. या गौप्यस्फोटामुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे. तर एवढे दिवस कोणाच्या गणतीत नसलेला प्रभाकर साईल मात्र हिरो झाला आहे.

- Advertisement -

प्रभाकर साईल हा मूळचा पुण्याचा असून झटपट पैसै कमावण्याकडे त्याचा कल आहे. अंधेरी तेलीगल्ली साईवाडी येथे राहणारा प्रभाकर हा लॉकडाऊन पूर्वी अंधेरीतील एका उद्योजकाकडे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होता. चांगल्या नोकरीच्या तो कायम शोधात असायचा. मात्र २०२० मध्ये लॉकडाऊन झाला आणि प्रसादचे काम सुटले. यामुळे प्रसाद बेकार झाला. त्यातच त्याचे पत्नीबरोबरही सतत वाद होत असल्याने पत्नी दोन मुलींना घेऊन विभक्त राहू लागली. तर प्रसाद  मिळेल ते काम करत होता.

- Advertisement -

याचदरम्यान, अंधेरीतील कोलडोंगरी परिसरात लॉकडाऊनमुळे बंद पडलेला एकजीज चायनीज स्टॉल त्याने भाड्याने घेतला. मित्रांच्या मदतीने त्याने तिथे होलसेल भाजीचे दुकान थाटले. पण त्यातूनही अपेक्षित पैसा मिळत नसल्याने अधिक पैसा मिळणारं काम शोधण्यास सुरुवात केली. अधिक पैसा मिळवून देणाऱ्या कामाच्या शोधात असतानाच प्रसादची ओळख किरण गोसावी याच्याबरोबर झाली. त्यानंतर जुलै महिन्यापासून प्रसाद भाजीच्या दुकानात दिसेनासा झाला. मात्र आता त्याला थेट एनसीबीचा पंच झाल्याचे बघून त्याच्या परिचितांचेही डोळे पांढरे झाले असून हा तिथपर्यंत पोहचलाच कसा असा प्रश्न प्रभाकरला ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात येत आहे.

तर दुसरीकडे गेली चार महिने तो संपर्कात नसल्याचे प्रभाकरच्या आईनेच सांगितले आहे. यामुळे प्रसाद गेले अनेक महिने गोसावी याच्याबरोबर उलट सुलट काम करत असावा. पण प्रकरण आता गळ्याशी आल्याने आणि यात गोसावी बरोबर आपण नाहक अडकू शकतो हे लक्षात आल्यानेच त्याने हा सेफ गेम केला असावा अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.

वानखेडे यांच्याकडून जीवाला भिती असल्याचेही प्रभाकरने मुंबई पोलिसांना सांगितले असून त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -